IPL 2025 : प्रीतीची 'ती' चूक अन् तो! पंजाबच्या ताफ्यातील 'फिनिशर'ची गोष्ट

२० लाखाच्या गड्यासाठी पंजाब फ्रँचायझी संघाने ५.५० लाख रुपये मोजल्याचे पाहायलाम मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:57 IST2025-05-08T15:57:07+5:302025-05-08T15:57:55+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 PBKS vs DC 58th Match Lokmat Player to Watch Shashank Singh Punjab Kings | IPL 2025 : प्रीतीची 'ती' चूक अन् तो! पंजाबच्या ताफ्यातील 'फिनिशर'ची गोष्ट

IPL 2025 : प्रीतीची 'ती' चूक अन् तो! पंजाबच्या ताफ्यातील 'फिनिशर'ची गोष्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 PBKS vs DC 58th Match Player to Watch Shashank Singh Punjab Kings :  आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्जचा संघ पहिल्या जेतेपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरलाय. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघात डावाला सुरुवात करताना अनकॅप्ड प्रभसिमरन सिंगचा तोरा, गोलंदाजीत अर्शदीप सिंगचा जलवा आणि फिनिशरच्या रुपात शशांकचा 'सिंग इज किंग शो' संघासाठी उपयुक्त ठरताना दिसतोय. शशांक सिंह हा तोच मोहरा आहे ज्याच्यावर प्रीती झिंटानं चुकून बोली लावल्याची चर्चा गाजली होती. काहीवेळा जे घडतं भल्यासाठीट असतं या धाटणीत पंजाबसाठी तो फायद्याचा सौदा ठरताना दिसतोय. पंजाबच्या संघासाठी तो 'किंग मेक'रची भूमिका बजावताना दिसतोय. इथं नजर टाकुयात आयपीएलमधील त्याच्या कामगिरीवर....  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

 
प्रीतीची ती चूक अन् तो... 

IPL २०२४ च्या मिनी लिलावात शशांक सिंहचं नाव आल्यावर प्रिती झिंटानं पॅडल उचललं.  मल्लिका सागरनं सौदा फिक्स झाल्याची घोषणा केल्यावर प्रिती झिंटासह पंजाबच्या ऑक्शन टेबलवर संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. प्रीती फसली अन् तिने चुकीच्या गड्यावर बोली लावली अशी चर्चा रंगल्याचेही पाहायला मिळाले. लिलावात शशांक सिंह नावाचे दोन खेळाडू असल्यामुळे हा गोंधळ झाला होता. यावर स्पष्टीकरण देताना पंजाब किंग्जच्या संघाने आम्हाला ज्या शशांकला संघात घ्यायचे होते, त्याच्यावर आम्ही बोली लावलीये. पण एकाच नावाच्या दोन खेळाडूंमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्टीकरण पंजाबच्या संघाने दिले होते. पण जे घडलं ते सगळं बाजूला ठेवून शशांक सिंहनं आपली छाप सोडली. त्यानंतर प्रीतीनं त्याच्या सकारात्मकतेचं कौतुक करताना तो स्क्रिप्ट चेंज करण्याची धमक असणारा मोहरा असल्याचे म्हटले होते. 

मग तो झाला PBKS च्या भरवाशाचा गडी

ज्या शशांक सिंहवर बोली लावल्यावर गोंधळ झाला होता त्याने २०२४ च्या हंगामात धमाका केला. १४ सामन्यात त्याने २ अर्धशतकासह ३५४ धावा करत आपल्यातील फिनिशिंग पॉवर दाखवून दिली. आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी झालेल्या मेगा लिलावाआधी पंजाबच्या संघाने फक्त दोन खेळाडूंना कायम ठेवले होते. त्यात शशांक सिंहच्या नावाचा समावेश होता. २० लाखाच्या गड्यासाठी पंजाब फ्रँचायझी संघाने ५.५० लाख रुपये मोजल्याचे पाहायलाम मिळाले.

रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता...

फिनिशरच्या रुपात पंजाबसाठी ठरतोय उपयुक्त

शशांक सिंह याने पंजाब किंग्जच्या ताफ्यातून फिनिशरच्या रुपात आपली खास ओळख निर्माण केलीये. दोन हंगामापासून पंजाबचा भाग असलेला हा खेळाडूने २०१९ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने आतापर्यंत त्याने ३५ सामन्यात ३ अर्धशतकांसह ६३७ धावा काढल्या आहेत. उजव्या हाताने स्फोटक फलंदाजीसह मॅचला कलाटणी देण्याची त्याची क्षमता पंजाबसाठी उपयुक्त ठरताना दिसत आहे.

Web Title: IPL 2025 PBKS vs DC 58th Match Lokmat Player to Watch Shashank Singh Punjab Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.