इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील २२ वा सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना न्यू पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यावेळी स्टेडियम स्टँडमध्ये पंजाबची संघ मालकीण प्रीती झिंटाशिवाय आणखी एक चेहरा लक्षवेधी ठरताना दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल आणि RJ माहवश सातत्याने चर्चेत आहेत. ही दोघे एकमेकांसोबत डेट करत असल्याची चर्चा रंगत आहेत. त्यात आता ती पंजाबच्या संघाला सपोर्ट करताना दिसली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चहलची कथित गर्लफ्रेंड स्टेडियममध्ये दिसली अन्...
पंजाब विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान स्टेडियम स्टँडमध्ये तिची झलक दिसल्यावर सोशल मीडियावर ती पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहे. स्टेडियममधील तिचे फोटो व्हायरल होत असून ती पंजाबसह चहलला चीअर करण्यासाठी आलीये, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. स्टँडमधील तिची उपस्थितीत चहलसोबत ती रिलेशनशिप असल्याचा पुरावाच आहे, अशी चर्चाही आता रंगू लागली आहे.
"कोई... मिल गया.." युवा प्रियांशच्या शतकी खेळीवर प्रीती झिंटाही झाली फिदा (VIDEO)
चहलनं धोनीचा कॅच घेतला अन् ती जाम खूश झाली
युजवेंद्र चहल हा पंजाब किंग्जच्या संघातील प्रमुख खेळाडू आहे. त्याच्या गर्लफ्रेंडची झलक दिसली. पण चहल कधी गोलंदाजीला येणार असा प्रश्नच या सामन्यात पडला होता. RJ माहवश ही स्टेडियमवर सामन्याचा आनंद घेताना स्पॉट झाल्यावर कॅमेरा मैदानात फिल्डिंग करणाऱ्या चहलकडेही फिरला होता. पण गोलंदाजीला काही तो लवकर आला नाही. श्रेयस अय्यरनं १७ व्या षटकात त्याला पहिली ओव्हर दिल्याचे पाहायला मिळाले. हे एकच षटक त्याने टाकले. अखेरच्या षटकात यश ठाकूरच्या षटकात चहल पुन्हा पिक्चरमध्ये आला. त्याने धोनीचा कॅच पकडला. चहलन कॅच घेतल्यावर ती ओरडून ओरडून धोनीच्या विकेटचा आनंद साजरा करताना दिसली.