आयपीएलच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नेतृत्वाची धूरा सांभाळणाऱ्या रजत पाटीदार याने टॉस जिंकत आपल्या कॅप्टन्सीची सुरुवात केली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सलामीच्या लढतीत त्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली पहिली ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या संघाने दमदार सुरुवात केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB च्या ताफ्यातील खेळाडूनं आधी कॅच सुटला, पण त्यानंतर काही क्षणातच विकेटही आली
जोस हेजलवूडनं पहिल्याच षटकात क्विंटन डिकॉकला अवघ्या ४ धावांवरतंबूत धाडले. या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर क्विटंन डिकॉकला एक जीवनदान मिळाले. सुयश शर्मानं त्याचा एक सोपा झेल सोडला. हा झेल आरसीबीला महागात पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला. पण तो फार काळ टिकला नाही. पाचव्या चेंडूवर क्विंटन डिकॉक यष्टिमागे झेल देऊन तंबूत परतला. जोश हेजलवूडनं RCB च्या संघाला त्याच्या रुपात एक मोठी विकेट मिळवून दिली.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली, फिलिप सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेविड, कृणाल पांड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल.
केकेआर प्लेइंग इलेव्हन
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉनसन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.