MS Dhoni Retirement Speculations: भारतीय संघाची माजी आणि यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा नेहमीच आश्चर्यकारक निर्णयानं चाहत्यांना थक्क करताना पाहायला मिळाले आहे. क्रिकेटच्या मैदानात कॅप्टन्सी करताना खेळलेला त्याचा डाव असो वा आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय त्याने चाहत्यांना वेळोवेळी आश्चर्याचा धक्का दिला आहे. कॅप्टन्सी सोडल्यावर २०१९ मध्ये वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या ताफ्यातून खेळताना न्यूझीलंड विरुद्ध रन आउट झाल्यावर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसणार नाही, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. पण भाऊनं २०२० मध्ये सर्वजण स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यात व्यस्त असताना सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून थांबतोय असं जगजाहिर केले. कितीही मोठा क्रिकेटर असला तरी त्याला थांबावे लागतेच, ही गोष्ट खरीये, पण धोनीनं मैदानातून निरोप घ्यावा, अशी त्याच्या प्रत्येकाची इच्छा होती, त्यामुळेच अनेकांना त्याचा निर्णय आश्चर्यचकित वाटला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धोनीनं दिले IPL मधून निवृत्तीचे संकेत
आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटशी आणि आपल्या चाहत्यांशी कनेक्ट आहे. २०२५ च्या हंगामात अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात तो मैदानात उतरणार आहे. गेल्या काही हंगामापासून तो आयपीएलच्या मैदानात उतरला की, हा हंगाम त्याचा शेवटचा असेल का? हा प्रश्न चर्चेत असायचा. धोनीनं डेफिनेटली नॉट म्हणत आपल्या निवृत्तीची चर्चा फोल ठरवली. पण आता त्याने खुद्द यंदाचा हंगाम शेवटचा असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हंगामासाठी धोनी चेन्नईच्या ताफ्यात सामील झाला आहे. यावेळी त्याने जो काळ्या रंगाचा स्टायलिश टी शर्ट घातला होता त्यावर लिहिलेल्या कोड लँगवेजमधून त्याने निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा रंगत आहे.
धोनीच्या ब्लॅक टी शर्टवर जे व्हाइट स्पॉट दिसताहेत त्यात नेमकं कोणते शब्द दडलेत?
होय, धोनीचा टी शर्टमधील फोटो तुम्ही नीट पाहिला तर तुम्ही म्हणाल यावर कुठं काय लिहिलंय. त्याच्या टी शर्टवर तर फक्त छोट्या छोट्या चौकोनांची डिझाइन आहे. पण ती डिझाइन नाही तर मोर्स कोड भाषेतील त्या तीन ओळींचा मजकूर त्यात लिहिलेला आहे. धोनीच्या मोर्स कोड मेसेजमधील पहिल्या ओळीचा अर्थ वन, दुसऱ्या ओळीत- लास्ट अन् तिसऱ्या ओळीचा अर्थ टाइम असा होता. याचाच अर्थ धोनीच्या टी शर्टवर जी डिझाइन सारखी दिसते त्या कोडिंगचा अर्थ वन लास्ट टाइम असा होता. त्यामुळेच धोनीनं यंदाचा हंगाम शेवटचा असल्याचे संकेत दिलेत का? असा प्रश्न निर्माण होतो.