नवी दिल्ली - चेन्नईवर सहा धावांनी मिळविलेल्या विजयात नितीश राणाची आक्रमक फटकेबाजी निर्णायक ठरली, तो आमच्यासाठी मॅचविनर असल्याची प्रतिक्रिया न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसन याने व्यक्त केली. नितीशने तिसन्या स्थानावर फलंदाजी करीत राजस्थानला ९ बाद १८२ धावांपर्यंत मजल गाठून दिली होती. याशिवाय वानिंदू हसरंगाने चार बळी घेतले.
काळजीवाहू कर्णधार रियान परागने शिवम दुबेचा झेल एका हाताने टिपला. यावर विल्यमसन म्हणाला की, 'नितीश हा फिरकीविरुद्ध उत्कृष्ट खेळाडू आहे. मात्र, काल डावाला प्रारंभ मुळात वेगवान गोलंदाजांविरुद्ध केला, त्याची फटकेबाजी पाहताना त्याच्यातील प्रतिभावान फलंदाजाचे दर्शन घडले. नितीश आज मॅचविनर होता. आमच्या संघाचे क्षेत्ररक्षणदेखील उच्च दर्जाचे होते.'
धोनीबाबत बोलताना विल्यमसन म्हणाला की, 'चेन्नई संघ विरोधी मैदानावर खेळत असतानाही मोठ्या संख्येने प्रेक्षक पिवळ्या पोशाखात आले होते. चाहत्यांचा हा उत्साह अविश्वसनीय असाच होता. धोनी एका षटकात २० धावा काढून सामना जिंकून देईल, असे वाटले होते. याआधीही त्याने अनेकदा असे केले आहे. पण, कठीण काम होते. १२ चेंडूंत ४० धावांची गरज होती. धोनी खेळपट्टीवर असेल तर विरोधी संघांना धावांचा बचाव करणे किती कठीण असते याची कल्पना करू शकतो, धोनीला बाद होताना पाहून आम्ही सुखावलो.'
धोनीसमोरच उडवले हेलिकॉप्टर
पहिल्या दोन सामन्यात फुसका बार ठरलेला रियान पराग चेन्नई विरुद्धच्या सामन्यात लयीत खेळताना दिसला, चांगली सुरुवात मिळाल्यावर तो ३७धावांवर बाद झाला,
या खेळीत त्याने २ खणखणीत चौकारांसह २ षटकारही ठोकले. पण, त्याच्या भात्यातून आलेला एक षटकार धोनीच्या हेलिकॉप्टर स्टाइलमध्ये आला. धोनीसमोर त्याने हा फटका खेळल्यामुळे याची सोशल मीडियावर चर्चाही रंगू लागली आहे
राजस्थानच्या कर्णधाराला १२ लाखांचा दंड
आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध कूर्मगती गोलंदाजीसाठी राजस्थानचा कर्णधार रियान पराग याला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. यंदाच्या सत्रात संघाचा हा पहिला गुन्हा आहे. राजस्थानने परागच्या नेतृत्वात काल बारसापारा स्टेडियममध्ये सहा धावांनी विजय नोंदविला होता. राजस्थान संघ ५ एप्रिल रोजी पंजाबविरुद्ध मुल्लापूरमध्ये पुढचा सामना खेळेल.
Web Title: IPL 2025: Nitish Rana is a 'matchwinner' for us: Kane Williamson praises him
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.