Join us

दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं UAE चं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?

दिल्ली कॅपिटल्सनं ज्याच्यासाठी ६ कोटी मोजले त्याने युएईचं फ्लाइट पकडले अन् त्याच्या IPL मध्ये सहभाग घेण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:42 IST

Open in App

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा सुधारित वेळापत्रकासह नव्याने सुरु होणार आहे. १८ व्या हंगामातील आयपीएल स्पर्धेतील शेवटच्या टप्प्यातील लढती या १७ मे पासून सुरु होत आहेत. पण काही परदेशी खेळाडूंनी पुन्हा  मैदानात उतरण्यास नकार दिला आहे. यात ऑस्ट्रेलियन खेळाडू जेक फ्रेझर-मॅकगर्कचाही समावेश आहे. त्याने IPL मधून माघार घेतल्यावर दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी संघाने नवा डाव खेळत बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याला बदली खेळाडूच्या रुपात आपल्या ताफ्यात सामील केले. आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या गड्यासाठी दिल्ली कॅपिटल्सनं  ६ कोटी मोजले आहेत. पण त्याने युएईला फ्लाइट पकडले अन् त्याच्या IPL मध्ये सहभाग घेण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मुस्तफिझुर रहमान IPL ला पसंती देणार की, युएईत खेळणार?

बांगलादेशचा संघ १७ आणि १९ मे या दिवशी युएई विरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आधीच आपल्या संघाची घोषणा केली आहे. ज्यात मुस्तफिझुर रहमानचाही समावेश आहे. त्यामुळेच तो आयपीएलला पसंती देणार की, बांगलादेश संघाकडून युएईच्या मैदानात उतरणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...

बांगलादेश क्रिकेट बोर्डासमोर मोठा प्रश्न? पाकमधील PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार

क्रिकबझच्या वृत्तानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निझामुद्दीन चौधरी म्हणाले आहेत की, ठरलेल्या नियोजनानुसार  मुस्तफिझुर रहमान युएईतील मैदानात उतरणे अपेक्षित आहे. आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी किंवा मुस्तफिझुर रहमान याने आमच्याशी यासंदर्भात कोणत्याची प्रकारे संपर्क साधलेला नाही. आयपीएलमध्ये खेळण्यापासून आम्ही त्याला रोखू इच्छित नाही, पण याच वेळी त्याला राष्ट्रीय संघाकडूनही खेळाचे आहे. जर त्याला परवानगी दिली तर रिशाद हुसेन आणि नाहिद राणा यांना पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळण्याची परवानगी द्यावी लागेल. जर त्यांना परवानगी नाकारली तर ते योग्य ठरणार नाही. कुणालाही बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे बोट दाखवण्याची संधी आम्हाला द्यायची नाही, असे बांगलादेश बोर्डाने म्हटले आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५इंडियन प्रीमिअर लीगबांगलादेशदिल्ली कॅपिटल्स