Join us

MS Dhoni Record : धोनीचा मोठा पराक्रम; IPL मध्ये कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं

एक नजर महेंद्रसिंह धोनीने सेट केलेल्या विक्रमावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:33 IST

Open in App

IPL 2025 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात MS धोनीसह CSK चा संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. पण वयाच्या ४३ व्या वर्षी विकेटमागे तो ज्या पद्धतीने आपली धमक दाखवतोय ते कमालीचे आहे. डोळ्यांची पापणी लवण्या आधी स्टंम्पिग करत लक्षवेधून घेणाऱ्या धोनीनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात एक खास विक्रम आपल्या नावे केला. आतापर्यंत कुणालाही जमलं नाही तो पराक्रम त्याने करून दाखवला आहे. जाणून घेऊयात धोनीच्या खास विक्रमासंदर्भातील स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

विकेटमागे सर्वाधिक कॅचेस घेणारा विकेट किपर ठरला MS धोनी

एमएस धोनीनं पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर विकेटमागे नेहल वढेराचा झेल घेतला. या झेलसह त्याने यष्टीमागे १५० झेल टिपण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय. अशी कामगिरी करणारा तो  IPL मधील पहिला विकेट किपर ठरलाय. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दिनेश कार्तिकचा नंबरल लागतो. आयपीएलमध्ये त्याने  १३७ झेल घेतले आहेत. या यादीत वृद्धिमान साहा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ८७ झेल टिपल्याची नोंद आहे.

Retired Out पॅटर्नसह CSK नं केली MI ची कॉपी; रिझल्टही तसाच लागला; PBKS नं सामना जिंकला

आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल टिपणारे यष्टिरक्षक

  • १५० झेल - एमएस धोनी
  • १३७ झेल - दिनेश कार्तिक
  • ८७ झेल - वृद्धिमान साहा
  • ७६ झेल - रिषभ पंत
  • ६६ झेल - क्विंटन डी कॉक

 

पंजाब विरुद्धच्या सामन्यात पाचव्या क्रमांकवर येऊन फटकेबाजी, पण...

पंजाब विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. याआधीच्या सामन्याच्या तुलनेत यावेळी त्याने तुफान फटकेबाजी केली. १२ चेंडूत २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं त्याने २७ धावा केल्या. पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. एमएस धोनी याआधी सातव्या, आठव्या आणि नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसले होते. आगामी सामन्यातही तो लवकरच खेळायला येईल, अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स