आयपीएल संघ पंजाब किंग्जने ग्लेन मॅक्सवेलच्या जागी मिचेल ओवेनचा त्यांच्या संघात समावेश केला. बोटाच्या दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेल स्पर्धेतून बाहेर पडला, जो खराब फॉर्मशी झुंजत होता. त्याच्या जागी बदली खेळाडूची संघात निवड करणे पंजाबच्या संघासाठी आव्हानात्मक होते. अखेर पंजाबने मिचेल ओवेनच्या नावासमोर शिक्कामोर्तब केले. ओवेनला टी-२० लीगमध्ये खेळण्याचा अनुभव असून आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना तो चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.
मिचेल ओवेन जन्म १६ सप्टेंबर २००१ रोजी झाला आहे. मिचेल ओवेन हा मधल्या फळीचा फलंदाज आहे. बिग बॅश लीगमध्ये त्याने होबार्ट हरिकेन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तर, दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये पार्ल रॉयल्सकडून खेळला आहे. याशिवाय, तो पीएसएसमध्ये पेशावर झल्मी संघाचा भाग होता.आता तो पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये मिचेल ओवेनची कामगिरीमिचेल ओवेनने बीबीएलमध्ये २४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २१ डावांमध्ये ५३१ धावा केल्या, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये त्याने ३ डावांमध्ये फक्त १४ धावा केल्या. तर, पीएसएलमध्ये त्याने ६ डावांत १०१ धावा केल्या आहेत. मिचेल ओवेनने त्याच्या एकूण टी-२० कारकिर्दीत ३४ सामने खेळले आणि ६४६ धावा केल्या.
गुणतालिकेत पंजाबचा संघ कितव्या स्थानावरश्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पंजाबने १० पैकी ६ सामने जिंकले आहेत आणि ३ सामने गमावले आहेत. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला. पंजाबचे सध्या १३ गुण (+०.१९९) आहेत. आज त्यांचा सामना लखनौशी होणार आहे. हा सामना पंजाबने जिंकल्यास ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचतील.