Mumbai Indians vs Gujarat Titans, 56th Match : गुजरात टायटन्सच्या संघाने रंगतदार सामन्यात घरच्या मैदानावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभूत करत २ गुणांसह गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे गुजरात टायटन्सच्या संघाला १९ व्या षटकात १४७ धावांचे टार्गेट मिळाले होते. मुंबई इंडियन्सकडून दीपक चाहर १५ धावांचा बचाव करायला आला. या अखेरच्या षटकात स्लो ओव्हर रेटमुळे पाच फिल्डर सर्कलमध्ये असल्यामुळे गुजरातचा पेपर आणखी सोपा झाला. त्यात चाहरनं एक नो बॉल टाकला. एवढेच नाही तर शेवटच्या चेंडूवर हार्दिक पांड्याच्या चुकीमुळे रन आउटची निर्माण झालेली संधी गमावल्यामुळे हा सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्याची MI ची अखेरची संधी हुकली अन् संघाने सामन्यासह दोन गुणही गमावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शेवटच्या षटकात काय घडलं?
सुधारित टार्गेटनुसार, अखेरच्या षटकात गुजरात टायटन्सच्या संघाला ६ चेंडूत १५ धावांची आवश्यकता होती. राहुल तेवतियाने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत गोलंदाजी करणाऱ्या दीपक चाहरवर दबाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेत त्याने स्ट्राइक जेराल्ड कोएट्झी (Gerald Coetzee) याला स्ट्राइक दिलेय या पठ्ठ्यानं तिसऱ्या चेंडूवर षटकार मारत गुजरात टायटन्सच्या संघाला विजयाच्या आणखी जवळ नेले. त्यात दीपक चाहरनं नो बॉल टाकला. फ्री हिटवर फक्त एक धाव आली अन् चौथ्या चेंडूवर स्ट्राइक पुन्हा राहुल तेवतियाकडे आले. या चेंडूवरही दीपक चाहरनं एक धाव दिली. पाचव्या चेंडूवर जेराल्ड कोएट्झी झेलबाद झाला. शेवटच्या चेंडूवर एक धावेची गरज असताना अर्शद खान याने मिडऑफच्या दिशेनं चेडू टोलावला. हार्दिक पांड्याकडे अर्शदला रन आउट करून हातून निसटलेला सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्याची संधी होती. पण त्याने चूक केली. सूर्यकुमार स्टंप जवळ असताना त्याने डायरेक्ट थ्रो मारण्याचा केलेला प्रयत्न फसला अन् गुजरात टायटन्सने हा सामना ३ विकेट्स राखून जिंकला. या विजयासह गुजरातचा संघ १६ गुणांच्या कमाईसह टॉपला पोहचला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
बुमराह, बोल्ट,अश्वनीनं ३ ओव्हरमध्ये फिरवलेली मॅच!, पण...
वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लो स्कोअरिंग मॅचमध्ये पावसाच्या व्यत्यामुळे खेळात आणखी रंगत आल्याचे पाहायला मिळाले. पावसामुळे दुसऱ्या डावातील १४ षटकानंतर खेळ थांबला त्यावेळी गुजरात टायटन्सचा संघ डकवर्थ लुईस नियानुसार ८ धावांनी पुढे होता. त्यानंतर खेळ सुरु झाल्यावर १५ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहनं शुबमन गिलची विकेट घेत मुंबई इंडियन्सच्या संघाला दिलासा दिला. त्यानंतर गोलंदाजीसाठी आलेल्या ट्रेंट बोल्टनं शेरफेन रुदरफोर्ड (Sherfane Rutherford) याला पायचित करत गुजरात टायटन्सच्या संघाला आणखी एक धक्का दिला. 'कन्कशन सब्स्टीट्यूट' रुपात खेळणाऱ्या अश्वनी कुमार याने राशीद खानची विकेट घेतली अन् सामन्यात ट्विस्ट आले. १८ व्या षटकानंतर खेळ पुन्हा थांबला त्यावेळी मुंबई इंडियन्सचा संघ ४ धावांनी पुढे होता. १२ चेंडूत २४ धावांची गरज असताना एक षटक कमी करण्यात आल्यावर गुजरात टायटन्सच्या संघाला १४७ धावांच्या नव्या टार्गेटसह अखेरच्या षटकात १५ धावांची गरज होती. याचा बचाव करण्यात दीपक चाहर अपयशी ठरला.