Join us

IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव स्पर्धेतून बाहेर!

Mayank Yadav Ruled Out: आयपीएल २०२५ मधील उर्वरित सामने खेळवण्याआधी लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 23:20 IST

Open in App

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर येत्या १७ एप्रिलपासून आयपील २०२५ मधील उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर केले. मात्र, याआधीच लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. लखनौचा वेगवान गोलंदाज मयांक यादव दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला. त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली.

लखनौच्या संघाने दिलेल्या माहितीनुसार, संघाचा वेगवान गोलंदाज मयांक यादव पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. लखनौच्या उर्वरित सामन्यांमध्ये मयांक यादवऐवजी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल्यम ओ'रोर्क संघाचे प्रतिनिधीत्व करेल. मयांक बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परतला आहे.

मयांक यादव मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळला. दोन सामन्यात त्याला दोन विकेट्स मिळवता आले. आयपीएलच्या इतिहासात १५६.७ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून प्रसिद्धीझोतात आलेला हा वेगवान गोलंदाज वेगाशी झुंजताना दिसला.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ पुढे ढकलण्यात आले. आयपीएलमध्ये आतापर्यंत ५७ सामने खेळले गेले आहेत. नुकतेच बीसीसीआयने अंतिम सामन्यासह १७ सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, पंजाब आणि दिल्ली यांच्यातील रद्द झालेला सामना पुन्हा खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना २४ मे रोजी जयपूर येथे होणार आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे ऐवजी ३ जून रोजी खेळवला जाईल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लखनौ सुपर जायंट्स