IPL 2025 LSG vs RCB Rishabh Pant Special Celebration After Slammed 2nd IPL Century : लखनौ सुपर जाएंट्स संघाचा कर्णधार रिषभ पंत याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात कडक खेळी केली. खणखणीत चौकार मारत त्याने आयपीएल कारकिर्दीतील आपले दुसरे शतक झळकावले. यंदाचा हंगाम रिषभ पंतसाठी भयावह स्वप्नासारखाच होता. पण शेवटच्या सामन्यात त्याने आपले तेवर दाखवतं RCB ची धकधक वाढवली आहे. शतकी खेळीनंतर रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत आपला आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. मैदानात त्याने केलेले सेलिब्रशन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB ला टेन्शन देणाऱ्या पंतच्या खेळीनं टीम इंडियाला मिळाला मोठा दिलासा
लखनौच्या संघाने रिषभ पंतवर पाण्यासारखा पैसा ओतला आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात २७ कोटी बोली लावत संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. संघाचे नेतृत्व करण्याची संधीही दिली. पण पंतला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सातत्याने तो अपयशी ठरताना दिसले. आरसीबी विरुद्धच्या लढती आधी त्याच्या भात्यातून १३ सामन्यात फक्त एक अर्धशतक आले होते. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने ४९ चेंडूत ६३ धावांची खेळी केली होती. ही खेळी सोडली तर प्रत्येक सामन्यात त्याच्या पदरी निराशा आली. पण अखेरच्या सामन्यात त्याने दमदार शतक झळकावले. लखनौच्या संघासाठी या शतकाचा तसा काही उपयोग नसला तरी RCB चं टेन्शन वाढवताना त्याने टीम इंडियाला मोठा दिलासा दिला आहे. कारण आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर उप कर्णधार पदाची जबाबदारी दिल्यावर त्याच्या भात्यातून आयपीएलमध्ये दुसरे शतक आले आहे.
४२७ धावांचं मिळालं 'टार्गेट'... संपूर्ण संघ अवघ्या २ धावांवर झाला 'ऑलआऊट', कुठे घडला प्रकार?
सात वर्षांनी रिषभ पंतच्या भात्यातून आले आयपीएलमधील दुसरे शतक
दिल्ली डेअरडेविल्स (सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळताना २०१८ च्या हंगामात रिषभ पंतनं आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले होते. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने १२८ धावांची खेळी केली होती. ही आयपीएल कारकिर्दीतील त्याची सर्वोच्च खेळीही आहे. आता सात वर्षांनी त्याच्या भात्यातून आयपीएलमधील दुसरे शतक आले आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात त्याने ६१ चेंडूत ११ चौकार आणि ८ षटकाराच्या मदतीने नाबाद ११८ धावांची खेळी केली.