IPL 2025 LSG vs RCB Jitesh Sharmas Revenge On Digvesh Rathi : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील साखळी फेरीतील शेवटचा सामना लखनौच्या इकान स्टेडियमवर खेळवण्यात आला. २०० पारच्या अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाईत कार्यवाहू कर्णधार जितेश शर्मानं आपल्या IPL कारकिर्दीतील पहिलं वहिलं अर्धशतक झळकावत संघाचा विजय अगदी सोपा केला. पण तुम्हाला माहितीये का? अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावर जितेश शर्मा फसला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चुकीचा फटका खेळला, झेल टिपल्यावर हताश होऊन जितेश गुडघ्यावर बसला, अन्...
चांगली फटकेबाजी सुरु असताना दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप फटका खेळण्याच्या नादात त्याने मोठी चूक केली. आयुष बडोनीनं कोणतीही चूक न करता त्याचा कॅचही टिपला अन् जितेश हताश होऊन गडघ्यावर बसला. कारण इथं फक्त अर्धशतक हुकणार नव्हतं तर RCB च्या बाजूनं सेट झालेला सामना LSG च्या बाजूनं वळणार होता. पण दरम्यान एक ट्विस्ट आला. दिग्वेशनं टाकलेला हा चेंडू नॉ बॉल निघाला अन् जितेश शर्मासह RCB च्या टॉप २ मधील एन्ट्रीची आस बाळगून बसलेल्या चाहत्यांना सुटकेचा निश्वास सोडला.
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
कधी अन् काय घडलं? हाच मॅचचा टर्निंग पाइंट ठरा का?
लखनौच्या संघानं दिलेल्या २२८ धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दमदार सुरुवात केली. पण सॉल्टची फटकेबाजी आणि कोहलीच्या अर्धशतकी खेळीनंतर संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या. विराट कोहली अर्धशतकी खेळी करून परतल्यावर जितेश शर्मा आणि मयंक अग्रवाल जोडी जमली. दोघांनी १६ व्या षटकातील टाइम आउट आधी ३ षटकात ५० धावा कुटल्या होत्या. अखेरच्या २४ चेंडूत ३९ धावांची गरज असताना १७ व्या षटकातील दिग्वेशच्या चेंडूवर जितेश शर्मानं रिव्हर्स स्विप ट्रॉय केला. चेंडूत सरळ आयुष बडोनीच्या हाती गेला. या विकेटनंतर दिग्वेशनं आपल्या स्टाइलमध्ये सेलिब्रेशन कर ग्राउंडवर जितेश शर्माची विकेट आपल्या खात्यात जमाही केली. पण हा चेंडू टाकताना दिग्वेशचा मागचा पाय क्रीजच्या लाइनला स्पर्श झाल्याचे दिसून आले अन् पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला. दिग्वेशचा हिशोब चुकला अन् जितेशला जीवनदान मिळाले. ही विकेट RCB चं गणित बिघडवणारी ठरू शकली असती.
मग जितेशनं असा काढला राग
नो बॉलवर मिळालेल्या फ्री हिटचा फायदा घेत जितेश शर्मानं उत्तुंग षटकार मारत बदला घेतला. यासह त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही साजरे केले. आयुष बडोनी घेऊन आलेल्या १९ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार मारत जितेश शर्मानेच मॅच संपवली.
Web Title: IPL 2025 LSG vs RCB Jitesh Sharmas Revenge On Digvesh Rathi After No Ball Twists Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.