IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला १ कोटींची 'लॉटरी'; किंमत मिळाल्यावर हिंमत दाखवण्याची हीच ती वेळ!

आयपीएलमध्ये त्याच्या भात्यातून एक शतकही पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:09 IST2025-05-27T12:05:34+5:302025-05-27T12:09:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs RCB 70th Match Lokmat Player to Watch Mayank Agarawal Royal Challengers Bengaluru | IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला १ कोटींची 'लॉटरी'; किंमत मिळाल्यावर हिंमत दाखवण्याची हीच ती वेळ!

IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला १ कोटींची 'लॉटरी'; किंमत मिळाल्यावर हिंमत दाखवण्याची हीच ती वेळ!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 LSG vs RCB 70th Match Player to Watch Mayank Agarawal Royal Challengers Bengaluru : रजत पाटीदार याच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ यंदाच्या हंगामातील शेवटचा साखळी सामना लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध खेळणार आहे. LSG संघ स्पर्धेतून आधीच आउट झालाय ते शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. दुसरीकडे RCB च्या संघासाठी प्लेऑफ्समधील टॉप २ मध्ये पोहचण्यासाठी ही लढत महत्त्वपूर्ण झाली आहे. लखनौच्या संघानं याआधी गुजरातला जर तरच्या समीकरणात अडकवलंय. जर या सामन्यात बंगळुरुकर फसले तर क्वॉलिफायर १ ची लढत ही पंजाब आणि गुजरात यांच्यात पाहायला मिळेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

या गड्यावरही असेल RCB ची मोठी जबाबदारी

ही वेळ टाळण्यासाठी विराट कोहली आणि फिल सॉल्ट या सलामी जोडीशिवाय मयंक अग्रवाल याच्यावर मोठी जबाबदारी असेल. प्लेऑफ्सआधी आरसीबीच्या गड्याने मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या मयंक अग्रवाल याला किंमत दिलीये. तो महत्त्वपूर्ण सामन्यात हिंमत दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

MI नं मोठी संधी गमावली अन् ते Eliminator मध्ये फसले! PBKS ठरला Qualifier 1 मधील पहिला संघ

'अनसोल्ड' राहिल्यावर मोक्याच्या क्षणी मिळाली IPL मध्ये एन्ट्री

मयंक अग्रवाल हा भारताचा अनुभवी क्रिकेटर आहे. उजव्या हाताच्या या फलंदाजामध्ये सामन्याला एकहाती कलाटणी देण्याची क्षमता आहे. पण मेगा लिलावात त्याच्यावर अनसोल्ड राहण्याची वेळ आली होती. प्लेऑफ्सच्या लढती आधी देवदत्त पडिक्कल याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यावर RCB च्या संघाने १ कोटी रुपयांसह मयंक अग्रवालला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. RCB नं किंमत दिल्यावर मध्यफळीत हिंमतीनं खेळून आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवण्याचे मोठे चॅलेंज त्याच्यासमोर असेल. 

कशी आहे त्याची आयपीएलमधील कामगिरी?

मयंक अग्रवाल याला संघात सामील केल्यावर SRH विरुद्धच्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळाली. पण या सामन्यात तो फक्त १० चेंडूत ११ धावांवर बाद झाला होता. मयंक अग्रवाल याने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या १२८ सामन्यात १ शतक आणि १३ अर्धशतकाच्या मदतीने २६७२ धावा काढल्या आहेत. आयपीएलमध्ये २०२० च्या हंगामात पंजाबच्या संघाकडून त्याने आयपीएलमध्ये शतकी खेळी केली होती. १०६ ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावंसख्या आहे.

Web Title: IPL 2025 LSG vs RCB 70th Match Lokmat Player to Watch Mayank Agarawal Royal Challengers Bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.