IPL 2025 : "घर आजा परदेसी..." गाणं वाजलं; आता लोकल टी-२० लीगमधील शतकवीराला मिळणार पहिली संधी

मार्करमच्या जागी त्याला आयपीएलमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. एक नजर त्याच्या खास रेकॉर्ड्सवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:02 IST2025-05-27T14:00:20+5:302025-05-27T14:02:27+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs RCB 70th Match Lokmat Player to Watch Aryan Juyal Lucknow Super Giants | IPL 2025 : "घर आजा परदेसी..." गाणं वाजलं; आता लोकल टी-२० लीगमधील शतकवीराला मिळणार पहिली संधी

IPL 2025 : "घर आजा परदेसी..." गाणं वाजलं; आता लोकल टी-२० लीगमधील शतकवीराला मिळणार पहिली संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 LSG vs RCB 70th Match Player to Watch Aryan Juyal Lucknow Super Giants :  इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जाएंट्स संघाचा प्रवास प्लेऑफ्सआधीच संपला. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ आपल्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ११ जून पासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमुळे या संघातील भरवशाचा अष्टपैलू खेळाडू एडन मार्करम मायदेशी परतणार आहे. लखनौच्या ताफ्यातील खेळाडूसाठी दक्षिण आफ्रिकेनं  "घर आजा परदेसी..." गाणं वाजल्यावर आता त्याच्या जागी लोकल टी-२० लीगमध्ये छाप सोडलेल्या २३ वर्षीय भारतीय अनकॅप्ड खेळाडूला लखनौच्या संघाकडून पहिला आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळू शकते. इथं एक नजर टाकुयात कोण आहे तो खेळाडू अन् कशी राहिलीये त्याची आतापर्यंतची कारकिर्द यासंदर्भातील खास गोष्ट

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कोण आहे तो भारतीय अनकॅप्ड खेळाडू?  
 
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तयारीसाठी मार्करमनं LSG संघाची साथ सोडल्यावर अखेरच्या सामन्यात या संघाकडून आर्यन जुयाल याला पदार्पणाची संधी मिळू शकते. तो मूळचा मुरादाबादचा आहे. या भारतीय अनकॅप्ड विकेट किपर बॅटरनं  देशांतर्गत क्रिकेटसह उत्तर प्रदेश टी-२० लीगमध्ये टॉप क्लास शो दाखवला आहे. २३ वर्षीय विकेटकीपर बॅटरनं आतापर्यंत २७ प्रथम श्रेणी सामन्यात ७ शतके आणि ६ अर्धशतकाच्या मदतीने १७६९  धावा केल्या आहेत. ३७ लिस्ट-ए सामन्यात त्याच्या खात्यात ४ शतके आणि ९ अर्धशतकासह १५११ धावा जमा आहेत. याशिवाय २३ टी-२० सामन्यात त्याने ४ अर्धशतकासह ५०५ धावा केल्यात.   

IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला १ कोटींची 'लॉटरी'; किंमत मिळाल्यावर हिंमत दाखवण्याची हीच ती वेळ!

टी२० त एक शतकही ठोकलंय

उजव्या हाताने स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या या गड्याने UP T20 लीगमध्ये एक शतकही ठोकले आहे. या लीगमध्ये गोरखपूर लायन्सच्या ताफ्यातून खेळताना नोएडा सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याने ५४ चेंडूत १०४ धावांची खेळी केली होती. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने दुसऱ्या क्वार्टर फायनल लढतीत उत्तर प्रदेशकडून खेळताना महाराष्ट्र विरुद्ध १४३ चेंडूत १५९ धावांची दमदार खेळी केली होती. पण ऋतुराज गायकवाडच्या द्विशतकी खेळीमुळे त्याची ही खेळी व्यर्थ ठरली होती.

यंदाच्या हंगामात अनेक लोकल स्टार्संनी दाखवला जलवा, आता..

प्रियांश आर्य, दिग्वेश राठी, (दिल्ली प्रीमियर लीग), विघ्नेश पुथुर (केरळ टी-२० लीग), अनिकेत वर्मा (मध्य प्रदेश टी-२० लीग) विपराज निगम (उत्तर प्रदेश टी-२० लीग) यांच्यानंतर आता आर्यन जुयाल हा देखील UP T20 लीग स्पर्धेनंतर आयपीएल गाजवण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. लखनौच्या संघाने त्याच्यासाठी ३० लाख रुपये मोजले आहेत.  

Web Title: IPL 2025 LSG vs RCB 70th Match Lokmat Player to Watch Aryan Juyal Lucknow Super Giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.