IPL 2025 LSG vs PBKS Yuzvendra Chahal Abuses Nicholas Pooran : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील १३ व्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात निकोल पूरन वर्सेस युजवेंद्र चहल यांच्यातील सामना कसा होणार? यावर सर्वांच्या नजरा होत्या. लखनौच्या ताफ्यातील कॅरेबियन स्टारनं पहिल्या षटकात ही लढाई जिंकली. लखनौच्या डावातील १० व्या षटकात चहल गोलंदाजीला आला. त्याच्या या षटकात दोन खणखणीत चौकार आणि षटकार मारून निकोलस पूरन याने चहलच स्वागत केले. चहलनं पूरन विरुद्ध गोलंदाजी करताना पहिल्या षटकात १५ धावा दिल्या. पण त्याचा हा तोरा चहलनं फार काळ टिकू दिला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चहलनं दुसऱ्याच षटकात घेतला निकोल पूरनचा बदला
पहिल्या षटकात केलेल्या धुलाईचा चहलनं दुसऱ्या षटकात बदला घेतला. चहल आपली दुसरे षटक घेऊन आला त्यावेळी लखनौचा युवा बॅटर आयुष बडोनी स्ट्राइकवर होता. त्याने एक धाव घेत निकोलस पूरनला स्ट्राइक दिले. या षटकातील दुसरा चेंडू निर्धाव टाकत चहलनं पूरनला चॅलेंज दिले. निर्धाव गेलेल्या चेंडूची भरपाई करण्यासाठी पूरननं मोठा फटका खेळला. पण चहलची गूगली त्याला कळली नाही अन् तो जाळ्यात अडकला. ग्लेन मॅक्सवेलनं सीमारेषेवर कोणतीही चूक न करता पूरनचा झेल टिपला. विकेट घेतल्यावर चहलनं पूरनवर रागही काढला. पॅव्हेलियनमध्ये परतणाऱ्या लखनौच्या स्टारला तो काहीतरी बोलताना दिसले.
IPL 2025 LSG vs PBKS : हा तर घाट्याचा सौदा! २७ कोटींच्या पंतनं ३ सामन्यात २७ धावा नाही काढल्या
निकोलस पूरनची फिफ्टी हुकली, चहलनं यंदाच्या हंगामातली पहिली विकेट घेतली
पहिल्यांदा फंलदाजी करताना आघाडीची फलंदाजी कोलमडल्यावर निकोल पूरन पुन्हा एकदा संघासाठी धावून आला. ठराविक अंतराने विकेट पडत असल्यामुळे निकोलस पूरन याने गियर बदलून बॅटिंग केली. तो आधी संयमी तोऱ्यात खेळताना दिसला. पण तो टॉप गियर टाकण्याच्या मू़डमध्ये असताना चहलन त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. पहिल्या दोन सामन्यात ७० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या पूरनचे अर्धशतक ६ धावांनी हुकले. त्याने या सामन्यात ३० चेंडूत ४४ धावा केल्या. यात त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. दुसऱ्या बाजूला पूरनच्या रूपात युजवेंद्र चहलनं यंदाच्या हंगामातील पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली.
पहिल्या सामन्यात ४ षटकांचा कोटाही पूर्ण न करू शकलेल्या आणि विकेट लेस राहिलल्या चहलनं यावेळी ४ षटके फेकली. यात त्याने ३६ धावा खर्च करत एक विकेटही घेतली. पूरनन पहिल्या षटकात ज्या १५ धावा कुटल्या तेच चहलचं महागडे षटक ठरले. पण पूरनची विकेट घेत त्यानेही भरपाईही केली.
Web Title: IPL 2025 LSG vs PBKS Yuzvendra Chahal Abuses Nicholas Pooran On Camera After Removing LSG Star Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.