Join us

LSG vs PBKS: अय्यरच्या सिक्सरसह पंजाबनं सामना जिंकला अन् त्या आधी प्रभसिमरनने प्रितीचा 'भरवसा'

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सलग दोन सामने जिंकणारा तिसरा संघ ठरला पंजाब किंग्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 23:19 IST

Open in App

IPL 2025 LSG vs PBKS : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात पंजाबचा संघ नव्या इराद्यानं मैदानात उतरल्याचे दिसते. गुजरात टायटन्सला त्यांच्या घरात जाऊन पराभूत केल्यावर आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघानं लखनौचंही मैदान मारलं आहे.  आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सलग दोन सामने जिंकणारा तिसरा संघ ठरला पंजाब किंग्ज पहिल्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत असलेल्या संघानं श्रेयस अय्यरव खेळलेला डाव एकदम परफेक्ट असल्याचे दिसून येत आहे. कारण संघाच्या विजयात कर्णधाराचा वाटाही मोलाचा दिसतोय.  

पंजाबच्या संघानं ८ विकेट्स अन् २२ चेंडू राखून जिंकला सामना 

रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबसमोर १७२ सलग दुसऱ्या विजयासह पंजाबनं यंदाच्या हंगामात निकोलस पूरन ४४ (३०), आयुष बडोनी ४१ (३३) आणि अब्दुल समद २७ (१२) यांनी केलेल्या खेळीच्या जोरावर लखनौच्या संघानं निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १७१ धावा करत पंजाबसमोर १७२ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाक़डून प्रभसिमरन सिंग ६९ (३४) आणि श्रेयस अय्यर ५२ (३०)*  यांच्या भात्यातून आलेल्या अर्धशतकासह नेहल वढेरानं  २५ चेंडूत केलेल्या २५ चेंडूतील ४३ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर पंजाबच्या संघानं १६.२ षटकातच हेआव्हान परतवून लावले. 

मॅच जिंकण्याआधी प्रभसिमरननं जिंकला प्रीतीचा 'भरवसा'

धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या संघानं पहिली विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर प्रभसिमरन सिंगनं तुफान फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिला. २०१९ पासून प्रभसिमरन पंजाब संघाचा भाग आहे. यंदाच्या हंगामाआधी प्रितीच्या मालकीच्या पंजाब संघानं फक्त तीन खेळाडूंना कायम ठेवले होते. त्यात प्रभसिरमन सिंगचा समावेश होता. सात वर्षे सातत्याने पंजाबची टीम त्याच्यावर भरवसा ठवताना दिसतेय. पहिल्या सामन्यात तो फक्त ५ धावा करून तंबूत परतला होता. पण यावेळी लखनौविरुद्ध जबरदस्त फटकेबाजीसह त्याने हा भरवसा कायम ठेवण्याचे संकेत देत सामना जिंकण्याआधी  संघाची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाचा भरवसा जिंकल्याचे दिसून आले. 

पहिल्या मॅचमध्ये शतक हुकलेल्या अय्यरनं सिक्सर मारुन फिफ्टी साजरी करत जिंकून दिली मॅच

पंजाब किंग्जच्या संघानं लखनौ विरुद्धचा सामना अगदी आरामात अन् एकतर्फी जिंकला. पण विजयासाठी मोजक्या धावांची गरज असताना पहिल्या सामन्यात ३ धावांनी शतकाला हुलकावणी मिळाल्यावर श्रेयस अय्यर या सामन्यात अर्धशतकाला मुकणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. अय्यर ४६ धावांवर  असताना पंजाबला विजयासाठी एका धावेची गरज होती. एका धावेची आवश्यकता असताना श्रेयस अय्यरनं अब्दुल समदच्या गोलंदाजीवर षटकार मारत अर्धशतक पूर्ण करत मॅच संवपली. 

 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५पंजाब किंग्सलखनौ सुपर जायंट्सश्रेयस अय्यररिषभ पंत