Digvesh Rathi Celebration Fined Video, IPL 2025 LSG vs PBKS: पंजाब किंग्ज संघाने बुधवारच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला ८ गडी राखून पराभूत केले. लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या होत्या. लखनौकडून निकोलस पूरनने ४४ धावा तर आयुष बडोनीने ४१ धावा केल्या. अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले. पंजाबने १७२ धावांचे आव्हान अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात १६.२ षटकात पूर्ण केले. पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंग याने सर्वाधिक ६९ तर कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद ५२ व नेहाल वढेराने नाबाद ४३ धावा केल्या. सामन्यात पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्य याला बाद केल्यानंतर गोलंदाज दिग्वेश राठीने सेलिब्रेशन केले. त्याने विराटच्या सेलिब्रेशनची (Virat Kohli like celebration ) नक्कल केली, पण त्याला त्यासाठी दंड ठोठवण्यात आला.
पंजाब किंग्जचा संघ आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला. त्यांची सुरुवात चांगली झाली होती. पण पॉवर प्ले मध्ये तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्यांची पहिली विकेट पडली. प्रियांश आर्य मोठी फटका मारायला गेला पण तो झेलबाद झाला. दिग्वेशने त्याची विकेट घेतल्यानंतर त्याच्या जवळ जाऊन 'नोटबूक सेलिब्रेशन' केले. विराट कोहलीनेही विंडिजचा केसरिक विल्यम्स याच्याविरोधात असे सेलिब्रेशन केले होते. तसेच सेलिब्रेशन दिग्वेश राठीने केले. पण त्याला मात्र हे सेलिब्रेशन करणं महागात पडले. त्याला दंड ठोठवण्यात आला.
दिग्वेश राठीला त्याच्या सेलिब्रेशनसाठी सामन्याच्या मानधनाच्या २५ टक्के रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली. तसेच एक डेमेरिट पॉइंटही (नकारात्मक गुण) देण्यात आला. दिग्वेश राठीने लेव्हल १ चा गुन्हा केला असल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला. हा गुन्हा IPL च्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दलचा आहे. त्याने गुन्हा मान्य केला असून त्याच्यावरील कारवाईही मान्य असल्याचे स्पष्ट केले.
Web Title: IPL 2025 LSG vs PBKS Lucknow Digvesh Rathi fined for his Virat Kohli like celebration check what he did
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.