Join us

IPL 2025 : 'निक्की'चा पॅटर्नच वेगळा! LSG च्या मोहऱ्याचा 'गगनचुंबी' तोरा अन् बरंच काही

वादळी खेळीनंतर  त्याच्या सेलिब्रेशनची गोष्ट चांगलीच गाजतीये, पण...

By सुशांत जाधव | Updated: April 1, 2025 09:05 IST

Open in App

IPL 2025 LSG vs PBKS 13th Match  Player to Watch Nicholas Pooran Lucknow Super Giants : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सर्वात तगडी फलंदाजी कोणत्या संघाची आहे? असा प्रश्न विचारला तर बहुतांश क्रिकेट चाहते पटकन काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स हैदराबाद संघाचे नाव घेतील. ते खरंही आहे. पण जर या स्पर्धेतील सर्वात स्फोटक फलंदाज कोण? असा प्रश्न असेल तर कदाचित सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील फलंदाजांपेक्षा एक वेगळे नाव तुम्हाला ऐकायला मिळू शकते. ते नाव म्हणजे लखनौच्या ताफ्यातील कॅरेबियन फलंदाज निकोलस पूरन. सध्याच्या घडीला तो टी-२० क्रिकेटमधील  सर्वात धडाकेबाज  फलंदाज आहे. त्याची झलक त्याने पहिल्या दोन सामन्यातच दाखवूनही दिलीये. यंदाच्या हंगामात तो किती वेळा फ्लाईंग किस देणार...ही गोष्टही चर्चेचा विषय ठरत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वादळी खेळीनंतर  त्याच्या सेलिब्रेशनची गोष्ट चांगलीच गाजतीये, पण...

निकोलस पूरनचं नाव घेतलं की, फ्लाईंग किस आलाच. आता पहिला प्रश्न हा की, तो हे कुणासाठी करतो? हा मुद्दा मांडण्याचं कारण सध्याच्या घडीला वादळी खेळीनंतर  त्याच्या सेलिब्रेशनची गोष्ट चांगलीच गाजतीये. कोण त्याचा संबंध विद्यमान मालकाशी लावतोय तर काहींनी त्याच्या सेलिब्रेशनचे कनेक्शन थेट जुन्या मालकीण बाई अर्थातच काव्या मारनशी जोडलाय. तो आधी सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळलाय. त्याला रिटेन न केल्याचा तो वेगळ्या अंदाजात सूड घेतोय अशा अर्थाने सोशल मीडियावर गोष्ट पसरवली जात आहे. ज्यात अजिबात तथ्य नाही. त्याचे सेलिब्रेशन कुणासाठी? हे जरी गुलदस्त्यात असले तरी जे रंगवलं जात आहे ते खोटे असल्याचे काही पुरावे आहेत.

Nicholas Pooran : वादळी खेळीसह निक्की भाईनं सेट केला खास रेकॉर्ड

फ्लाईंग किस सेलिब्रेशनमागची खरी गोष्ट

Nicholas Pooran

 चर्चित गोष्टीचा पहिला मुद्दा त्यानं फ्लाईंग किस सेलिब्रेशन काही यंदाच्या हंगामापासून सुरु केलेले नाही. वेस्ट इंडिजच्या संघाकडून आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मोठ्या खेळीनंतर त्याचा हा अंदाज पाहायला मिळाला आहे. बॅटिंग सोडा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विकेट किपर बॅटरनं गोलंदाजी करताना एक दोन नव्हे तर चार विकेट्स घेतल्या होत्या. २०२२ च्या पाक दौऱ्यात मोहम्मद मोहम्मद हॅरीसची विकेट घेतल्यावर पूरन याने फ्लाईंग किस सेलिब्रेशन पाहायला मिळाले होते. क्रिकेटच्या मैदानात अनेकजण अनोख्या शेलीत आनंद साजरा करतात. त्यात कॅरेबियन क्रिकेटर्सचे सेलिब्रेशन हटके असते. निकोलस पूरनचा चॅप्टन त्यापैकीच एक आहे. बाकी सर्व अफवाच.

टी-२० क्रिकेटमधील धडाकेबाज रेकॉर्ड

छोट्या फॉर्मेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीसह मोठे फटकेबाजी करण्याची त्याची क्षमता कमालीची आहे. आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने टी-२० कारकिर्दीतील ६०० षटकार मारण्याचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू आहे. या यादीत ख्रिस गेल  (१०५६), केरॉन पोलार्ड (९०८) आणि आंद्रे रसेल (७३३) हे तिघे त्याच्या पुढे आहेत. पण या तिघांनी ५०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. दुसरीकडे निकोल पूरन याने ३८६ सामन्यात ६१२ षटकार ठोकून आपली ताकद या आघाडीच्या गड्यांना फाईट देणारी असल्याचे दाखवून दिले आहे. तो यंदाच्या आयपीएल हंगामात  सर्वाधिक षटकार मारेल, अशी अपेक्षा आहे. एवढेच नाही तर ऑरेंज कॅपचाही तो प्रबळ दावेदार दिसतोय. 

यंदाच्या हंगामात जबरदस्त स्ट्राइक रेटसह केलीये सुरुवात

२०१७ च्या हंगामात तो मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. पण या फ्रँचायझीकडून त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईनं रिलीज केल्यावर तो पंजाबचा झाला. २०१९ च्या हंगामात त्याने फक्त १६८ धावा काढल्या होत्या. २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून पहिल्यांदा तो बिनधास्त फटकेबाजी करताना दिसला. या हंगामात त्याने ३०६ धावा केल्या. २०२३ च्या हंगामापासून तो लखनौच्या ताफ्यातून दिसतोय. लखनौकडून पदार्पणाच्या हंगामात त्याने ३५८ धावा केल्यावर गत हंगामात १४ सामन्यात त्याने ४९९ धावांपर्यंत मजल मारली होती. लखनौकडून खेळताना गत हंगामात त्याचा स्ट्राइक रेट १७८ च्या घरात होता. यंदाच्या हंगामाची सुरुवात त्याने २५० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं केलीय. कामगिरीतील सातत्य कायम ठेवण्यात तो यशस्वी ठरला तर कोणताही गोलंदाज त्याच्यासमोर टिकणं मुश्किलच आहे.  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लखनौ सुपर जायंट्सपंजाब किंग्सइंडियन प्रीमिअर लीग