IPL 2025 LSG vs PBKS 13th Match One More Failure For Rishab Pant : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गडी असा प्राइज टॅग लागलेल्या रिषभ पंत पुन्हा एकदा स्वस्तात माघारी फिरला. लखनौच्या इकाना आंतरारष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर लखनौ आणि पंजाब यांच्यात यंदाच्या हंगामातील १३ वा सामना खेळवण्यात येत आहे. घरच्या मैदानातील पहिल्या सामन्यात तरी रिषभ पंतचा रुबाब दिसेल, अशी अपेक्षा होती. पण तो पुन्हा अपयशी ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संघ अडचणीत असताना बेजबाबदार फटका
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौची सुरुवात खराब झाली. पहिल्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा मिचेल मार्श स्वस्तात माघारी फिरला. अर्शदीप सिंगनं त्याला खातेही उघडू दिले नाही. मार्करमला चांगली सुरुवात मिळाली. पण तोही १८ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. मार्करमची विकेट पडल्यावर पंत फलंदाजीला आला. अवघ्या ३२ धावांवर संघाने २ विकेट गमावल्या असताना पंत बेजबाबदार फटका मारून बाद झाला.
अश्वनी कुमारला मुंबई इंडियन्सच्या 'प्लेइंग ११'साठी कसं निवडलं? हार्दिक पांड्याने सांगितला किस्सा
चेंडू विकेट मिळेल असा अजिबात नव्हता, पंतनं एका खराब चेंडूवर फेकली विकेट
रिषभ पंतला जाळ्यात अडकवण्यासाठी श्रेयस अय्यरनं पॉवर प्लेमध्येच चेंडू ग्लेन मॅक्सवेलच्या हाती सोपवला. लखनौच्या डावीतील पाचव्या षटकातील ग्लेन मॅक्सवेल पाचव्या चेंडूवर पंत फसला. मॅक्सवेलचा चेंडू हा विकेट मिळवून देणारा नव्हता. एका खराब चेंडूवर खराब फटका खेळत पंतन आपली विकेट फेकली. ५ चेंडूचा सामना करून तो २ धावा करुन तंबूत परतला. आयपीएलमधील सर्वात महागड्या खेळाडूची पहिल्या तीन सामन्यातील सातत्यपूर्ण अपयशी कामगिरी पाहता लखनौच्या संघासाठी तो घाट्याचा सौदा ठरतोय, असेच दिसून येत आहे.
२७ कोटीच्या गड्यानं एका डावात सोडा ३ सामन्यात २७ धावा नाही केल्या
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढतीनं लखनौच्या संघानं आपल्या यंदाच्या हंगामाच्या मोहिमेची सुरुवात केली. या सामन्यात रिषभ पंतला खातेही उघडता आले नव्हते. ६ चेंडूचा सामना करून तो शून्यावर माघारी परतला होता. सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात त्याने दुहेरी आकडा गाठला. पण १५ चेंडूत १५ धावा करूनच तो थांबला. आता तिसऱ्या सामन्यात त्याने २ धावा करून तंबूचा रस्ता धरला. पहिल्या ३ सामन्यात त्याच्या खात्यात फक्त १७ धावा जमा आहेत. २७ कोटीच्या गड्याने एका डावात सोडा तीन सामन्यात २७ धावांचा आकडा गाठलेला नाही. ही संघासाठी निश्चितच चिंतेची बाब असेल.
Web Title: IPL 2025 LSG vs PBKS 13th Match Glenn Maxwell dismissed Rishabh Pant for 2 runs in 5 balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.