Shardul Thakur 200 Wickets T20 Cricket In 100th IPL Match : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यावर वाइल्ड कार्डसह आयपीएलमध्ये एन्ट्री करणारा शार्दुल ठाकूर सातत्याने आपल्या कामगिरीतील धमक दाखवून देताना दिसतोय. इंज्युरी रिप्लेसमेंच्या रुपात लखनौच्या ताफ्यातून मिळालेल्या संधीच त्याने सोन करून दाखवलं आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीची खास छाप सोडल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१०० व्या IPL सामन्यात साधला द्विशतकी डाव
लखनौच्या मैदानात रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना त्याच्यासाठी एकदम खास होता. आयपीएलच्या हंगामातील २६ सामन्यात तो शंभरावा आयपीएल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. या सामन्यात २ विकेट्स घेत त्याने द्विशतकी डाव शाधला आहे. पहिल्या तीन ओव्हरमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. पण अखेरच्या षटकात त्याने दोन विकेट्स घेत टी-२० क्रिकेटमध्ये २०० विकेट्सचा पल्ला गाठला.
LSG vs GT : स्ट्रॅटेजिक टाइम आउटमध्ये प्लॅन शिजला! रवी बिश्नोईच्या कामी आला झहीरचा सल्ला
तीन ओव्हर विकेट लेस राहिल्यावर हॅटट्रिकवर पोहचला होता शार्दुल
गुजरात विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूरनं शेरफेन रुदरफोर्डच्या रुपात आपली पहिली विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने राहुल तेवतियाला तंबूचा रस्ता दाखवत टी२० क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण केल्या. या सामन्यात दोन चेंडूवर दोन विकेट घेत तो हॅटट्रिकवर पोहचला होता. पण त्याची संधी हुकली. राशीद खान कॅच आउट होता होता वाचला अन् त्याच्या हॅटट्रिकची संधी हुकली.
फुलटॉस चेंडूवर घेतल्यात ४ विकेट्स
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यातील २ विकेट्ससह शार्दुल ठाकूरच्या खात्यात आता ११ विकेट्स जमा झाल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. रंजक गोष्ट ही की, आयपीएलमध्ये आतापर्यंत घेतलेल्या ११ विकेट्समध्ये ४ विकेट्स त्याने फुलटॉस चेंडूवर घेतल्या आहेत. अन्य कोणत्याही गोलंदाजाला फुलटॉसवर एक पेक्षा अधिक विकेट मिळालेली नाही.