Join us

MI नं शोधलेल्या 'हिऱ्या'ला GT नं दिला कोट्यवधींचा भाव; त्यानं फक्त २ मॅचमध्ये केली ३९ कोटींची 'कमाई'

यंदाच्या हंगामात गुजरातच्या ताफ्यातून तीन सामन्यात संधी मिळाली. त्यापैकी दोन मॅचमध्ये भाऊनं ३९ कोटींची कमाई केलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:27 IST

Open in App

IPL 2025 LSG vs GT 26th Match Lokmat Player to Watch Arshad Khan Gujarat Titans : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ दमदार कामगिरी करताना दिसतोय. बॅटिंगमध्ये कर्णधार शुबमन गिलसह संघाच्या डावाची सुरुवात करणारा साई सुदर्शन, जोस बटलर याशिवाय बॉलिंगमध्ये मोहम्मद सिराज, साई किशोर आणि प्रसिद्ध कृष्णा हे खेळाडू लक्षवेधी कामगिरी करताना दिसत आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये वॉशिंग्टनला संधी मिळाल्यावर त्यानेही मैफिल लुटल्याचे पाहायला मिळाले. या स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या संघातून एक अनकॅप्ड खेळाडूही अविश्वसनीय कामगिरीसह आपली छाप सोडताना दिसतोय. तो चेहरा म्हणजे अर्शद खान. मुंबई इंडियन्सच्या संघाने  शोधलेल्या या 'हिऱ्या'साठी कोट्यवधी मोजून गुजरात टायटन्सच्या संघाने त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलंय. या गड्याला  यंदाच्या हंगामात गुजरातच्या ताफ्यातून तीन सामन्यात संधी मिळाली. त्यापैकी दोन मॅचमध्ये भाऊनं ३९ कोटींची कमाई केलीये. ते कसं तेच आपण या लेखातून सविस्तरपणे जाणून घेऊयात. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मुंबई इंडियन्सच्या संघाने केली या 'हिऱ्या'ची पारख; मग तो लखनौचा नबाव झाला

डावखुऱ्या हाताने जलदगती गोलंदाजी करणारा आणि फलंदाजीत मोठे फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा अर्शद खान हा मूळचा बिहारमधील गोपाळगंजचा. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मध्य प्रदेश संघाचे प्रतिनिधीत्व करतो. २०२२ च्या हंगामात मुंबई इंडियन्सच्या स्काउट्सने ज्युनिअर स्तरावर या हिऱ्याची पारख करून त्याला आपल्या ताफ्यात जोडले होते. २० लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला. पण दुखापतीमुळे तो या हंगामाला मुकला. २०२३ च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला कायम ठेवले अन् पदार्पणाची संधीही दिली. पदार्पणाच्या हंगामात त्याने ६ सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या. पदार्पणात तो काही खास कमाल दाखवू शकला नाही. गत हंगामात तो लखनऊच्या ताफ्यातून खेळताना दिसले.  

IPL 2025: MS Dhoniच्या कॅप्टन्सीसाठी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा बळी? Viral Video मुळे चर्चांना उधाण

गुजरात टायटन्सनं केलं 'करोडपती'

लखनौच्या संघाकडून खेळतानाही त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. पण गत हंगामात त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ३३ चेंडूत ५८ धावांची नाबाद खेळी केली. त्याची ही खेळी गुजरात टायटन्सच्या मनात भरली. मग शुबमन गिलच्या संघाने मेगा लिलालावत या युवा अष्टपैलू खेळाडूवर कोट्यवधींचा डाव खेळला. २०२५ च्या हंगामाआधी झालेल्या मेगा लिलावात गुजरात टायटन्सच्या संघाने या खेळाडूसाठी १ कोटी ३० लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. 

२ मॅचमध्ये अर्शद खाननं केलेल्या ३९ कोटींच्या कमाईची गोष्ट

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीच्या ताफ्यातील अनमोल खेळाडू असलेल्या विराट कोहलीला आपल्या जाळ्यात अडकवले. आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला कोहलीच्या रुपात मोठी विकेट मिळाली. कोहलीची विकेट कोणत्याही  गोलंदाजासाठी अविस्मरणीय क्षण असते. हा युवा गोलंदाजही त्याला अपवाद नाही. याशिवाय राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्याने नव्या पिढीतील किंग असा टॅग लागलेल्या यशस्वी जैस्वालची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. कोहली आरसीबीकडून २१ कोटींसह खेळतोय. दुसरीकडे यशस्वी जैस्वालसाठी राजस्थानच्या संघाने १८ कोटी मोजले आहेत. या दोन विकेट्स घेत अर्शद खानने दोन मॅचमेध्ये ३९ कोटींची कमाईल केल्यासारखेच आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५गुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्सइंडियन प्रीमिअर लीग