IPL 2025 LSG vs DC Rishabh Pant Comes To Bat At No 7 : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आणि LSG चा कर्णधार रिषभ पंत यंदाच्या हंगाम धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. त्यात आता त्याच्यावर आणखी वाईट वेळ आल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात तो सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आला. याआधी आयपीएलमध्ये तो कधीच एवढ्या खालच्या क्रमांकावर बॅटिंग करताना दिसलेला नाही. हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंत आधी 'इम्पॅक्ट प्लेअर'ला मिळाली संधी
घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या लखनौच्या संघाला मार्करम आणि मार्श जोडीनं दमदार सुरुवात करून दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. निकोलस पूरन स्वस्तात माघारी फिरल्यावर मार्शही तंबूत फिरला. १०७ धावांवर लखनौच्या संघाने तिसरी विकेट गमावली. संघाला चांगली सुरुवात मिळाल्यावर रिषभ पंत बॅटिंगला येईल अशी अपेक्षा होती. पण तसे घडलेच नाही. अब्दुल समद, डेविड मिलर यांना पंत आधी मैदानात पाठवण्यात आले. ही गोष्ट कमी होती त्यात आयुष बडोनीची भर पडली. खास गोष्ट ही की, इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात खेळवण्यात आलेल्या बडोनीला पंतच्या आधी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. LSG च्या ताफ्यातील हा निर्णय समजण्यापलिकडचा आहे.
LSG vs DC : मार्करमची कडक खेळी; चीअर लीडर्सच्या 'डग आउट'मध्ये मारला सिक्सर (VIDEO)
कॅप्टन दोन बॉल शिल्लक असताना आला अन् त्यातही बोल्ड झाला
लखनौच्या डावातील अखेरचे दोन चेंडू शिल्लक असताना बडोनी २१ चेंडूवर ३६ धावा करून बाद झाला. मग त्याची जागा घेण्यासाठी पंत मैदानात आल्याचे पाहायला मिळाले. पण मुकेश कुमारनं त्याला एक चेंडू निर्धाव टाकला त्यानंतरच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या पंतचा प्रयत्न फसला अन् तो त्रिफळाचित झाला. पंत कॅप्टन असताना तो बॅटिंगला मागे का थांबला? हा निर्णय जर टीम मॅनेजमेंटचा असेल तर २७ कोटींच्या आयपीएलमधील सर्वात गड्याला LSG च्या ताफ्यात किंमत नाही का? असे अनेक प्रश्न आता उपस्थितीत होत आहेत.