IPL 2025 LSG vs DC KL Rahul Ignoring LSG Owner Sanjiv Goenka Video Goes Viral आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाचा दिल्ली कॅपिटल्ससमोर निभाव काही लागला नाही. अक्षर पटेलच्या दिल्लीच्या संघाने विशाखापट्टणमच्या मैदानात आपला घरचा सामना खेळताना रंगतदार सामन्यात लखनौला शह दिला होता. त्यानंतर आता लोकेश राहुलच्या उपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने लखनौला घरच्या मैदानात चारीमुंड्याचित केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
KL राहुलनं जुन्या संघाविरुद्ध दाखवले तेवर
वैयक्तिक कारणास्तव पहिल्या सामन्याला मुकल्यावर दुसऱ्या सामन्यात लोकेश राहुलनं नव्या संघाकडून खेळताना आपल्या जुन्या संघाविरुद्ध तेवर दाखवले. नाबाद अर्धशतकासह सिक्सर मारून दिल्लीला एकतर्फी विजय मिळवून देताना लोकेश राहुलनं IPL मध्ये सर्वात जलद ५००० हजार धावांचा विक्रमही आपल्या नावे नोंदवला. या सामन्यातील विजयानंतर केएल राहुलनं कूल अंदाजात केलेल्या सेलिब्रेशनसह माजी संघ मालक संजीव गोयंका यांच्यासोबतचा त्याचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.
केएल राहुलनं LSG संघ मालक गोयंका यांच्या हातात हात दिला, पण...
लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलनं षटकार मारून मॅच संपवली. त्यानंतर त्याने जर्सी नंबर दाखवत एकदम कूल अंदाजात सेलिब्रेशन केले. सामना संपल्यावर लखनौ सुपर जाएंट्सचे मालक मैदानात आले. लोकेश राहुलने त्यांच्या हातात हातही दिला. ते केएल राहुलसोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण स्टार क्रिकेटर त्यांची गोष्ट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून गेल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअॅक्शन व्हायरल
गत हंगामात ऐकून घेतलं, त्याची चर्चा झाली, अन् आता...
दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळण्याआधी लोकेश राहुल हा लखनौ संघाचे नेतृत्व करताना पाहायला मिळाले होते. गत हंगामात संघाच्या खराब कामगिरीनंतर संजीव गोयंका भर मैदानात त्याच्यावर ओरडताना दिसले होते. त्यावेळी त्याने ते सगळं शांतपणे ऐकून घेतल्याचेही पाहायला मिळाले. हंगाम संपला अन् नव्या हंगामासाठी संघ बांधणी सुरु असताना लोकेश राहुलनं LSG संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या जुन्या संघाविरुद्ध तेवर दाखवल्यावर त्या संघाचा मालकापासून त्याने लांब राहणेच पसंत केल्याचे दिसून आले. ही गोष्ट तो गत हंगामात जे घडलं ते विसरलेला नाही, हेच दाखवून देणारी आहे.