Join us

IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच

धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाकडून केएल राहुलसह ५७ (४२)* अभिषेक पोरेल ५१ (३६) याने अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 00:05 IST

Open in App

IPL 2025 LSG vs DC  : आयपीएल २०२५ च्या हंगामातील ४० व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने घरच्या मैदानात लखनौ सुपर जाएंट्सला धोबीपछाड दिली. लखनौच्या संघाने दिलेल्या १६० धावसंख्येचा पाठलाग करताना १८ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर केएल राहुलनं षटकार मारत अगदी दिमाखात संघाला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात नाबाद ५७ धावांची खेळी केली. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौच्या संघाने एडन  मार्करमचे अर्धशतक ५२ (३३) आणि मिचेल मार्श ४५ (३६) आणि आयुष बडोनी ३६ (२१) यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात १५९ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना  दिल्लीच्या संघाकडून केएल राहुलसह ५७ (४२)* अभिषेक पोरेल ५१ (३६) याने अर्धशतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

लखनौला पराभूत करत पाचव्यांदा साधला हा डाव दिल्ली कॅपिटल्स संघ यंदाच्या हंगामात कमालीची कामगिरी करताना दिसतोय. ८ सामन्यात ६ विजय मिळवत त्यांनी प्लेऑफ्सच्या शर्यतीत आपली दावेदारी आणखी भक्कम केली आहे. याआधी २००९, २०१२, २००१ आणि २०२१ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्या ८ सामन्यापैंकी सहा सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. पण आतापर्यंत त्यांनी एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. यंदाच्या हंगामात हा संघ नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.

 LSG vs DC : KL राहुलची क्लास खेळी! Sanjiv Goenka यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लखनौ सुपर जायंट्सदिल्ली कॅपिटल्सइंडियन प्रीमिअर लीगलोकेश राहुलरिषभ पंत