Retired Out केल्यावर मुंबईकर पेटून उठलाय; चेन्नईकर मात्र निवांतच! हेच असावं त्यामागचं कारण

आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आउट होणारा डेवॉन क्वान्वे एकंदरीत पाचवा आणि पहिला परदेशी फलंदाज ठरला. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:42 IST2025-04-14T10:32:49+5:302025-04-14T10:42:48+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 LSG vs CSK 30th Match Lokmat Player to Watch Devon Conway Chennai Super Kings | Retired Out केल्यावर मुंबईकर पेटून उठलाय; चेन्नईकर मात्र निवांतच! हेच असावं त्यामागचं कारण

Retired Out केल्यावर मुंबईकर पेटून उठलाय; चेन्नईकर मात्र निवांतच! हेच असावं त्यामागचं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 LSG vs CSK 30th Match  Player to Watch Devon Conway Chennai Super Kings : क्रिकेटच्या मैदानात एखाद्या फलंदाजावर Retired Out करणं  म्हणजे चारचौघांत त्याची अब्रू काढण्याचा प्रकारच. योगायोगानं यंदाच्या हंगामात हा प्रकार दोन लोकप्रिय संघांनी आजमावला. आधी मुंबई इंडियन्सनं तिलक वर्माला मोठी फटकेबाजी जमेना म्हणून मैदानातून डगआउटमध्ये बोलावले. आयपीएलमध्ये Retired Out होणारा तो चौथा बॅटर ठरला. हीच वेळ चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातही पाहायला मिळाली. अर्धशतकी खेळी करून संघाचा विजयाच्या आशा पल्लवित करणाऱ्या डेवॉन कॉन्वेला संघ व्यवस्थापनाने रिटायर्ड आउट केले. आयपीएलच्या इतिहासात रिटायर्ड आउट होणारा डेवॉन क्वान्वे एकंदरीत पाचवा आणि पहिला परदेशी फलंदाज ठरला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

Retired Out केल्यावर तिलक वर्मा पेटला; डेवॉन कॉन्वे मात्र निवांतच 

मुंबई इंडियन्सप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जलाही पराभवाचा सामना करावा लागला. आता हे घडल्यावर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एक नवा चॅप्टर पाहायला मिळतोय. तिलक वर्मा रागाने पेटून उठलाय. बॅक टू बॅक अर्धशतके झळकावत LSG विरुद्धच्या सामन्यात आपल्यासोबत जो जो काही अपमानजनक प्रकार घडला त्याचा जणू तो रागच काढताना दिसते. जी गोष्ट संघाच्या हिताचीही ठरतीये.  दुसरीकडे CSK नं डेवॉन कॉन्वेवर विश्वास ठेवला. पण तो या प्रकारानंतर निवांतच दिसला. 

IPL 2025 : बुमराह-नायर टक्कर! मग मैदानात रंगला ड्रामा; रोहित शर्माची रिअ‍ॅक्शन चर्चेत

 मूड कसाही असो ते टिपिकल मोडमध्येच दिसतात  

चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून आयपीएलच्या मैदानात उतरणारा डेवॉन कॉन्वे हा न्यूझीलंडचा क्रिकेटर. आता न्यूझीलंड संघ असो किंवा या संघातील खेळाडू यांचा क्रिकेटच्या मैदानात एक वेगळा स्वभाव पाहायला मिळाला आहे. क्रिकेटच्या मैदानात हार असो वा दिमाखदार  विजय किवींच्या ताफ्यातील मंडळी फार उत्साहित वैगेरे होत नाहीत. सगळ्या मूडमध्ये ते टिपिकल मोडमध्ये दिसतात. कदाचित याच स्वभाव धर्मामुळे डेवॉन कॉन्वेला रिटायर्ड आउट केल्याचा मनात राग वैगेरे नसेल, असेच वाटते. 

यंदाच्या IPL हंगामातील कामगिरी 

डेवॉन कॉन्वे हा क्रिकेटच्या मैदानातील एक प्रतिभावंत खेळाडू आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या यंदाच्या हंगामात त्याला तीन सामन्यात संधी मिळाली.  पंजाब किंग्ज विरुद्धच्या  ज्या सामन्यात त्याला रिटायर्ड आउट करण्यात आले त्या सामन्यात त्याने ४९ चेंडूत ६९ धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या सामन्यात तो ११ चेंडूत १२ धावा करून बाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्याआधी त्याने १३ चेंडूत १४ धावांची खेळी केली होती.  आता उर्वरित सामन्यात त्याला संघाकडून किती सामन्यात संधी मिळणार? अन् तो आपल्या टिपिकल अंदाजात संघासाठी किती उपयुक्त ठरणार ते पाहण्याजोगे असेल. 
 

Web Title: IPL 2025 LSG vs CSK 30th Match Lokmat Player to Watch Devon Conway Chennai Super Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.