Join us

LSG संघ मालक गोएंका यांच्या मनात KL राहुल 'फॅमिली मॅन'; पण..

लोकेश राहुलसंदर्भात संघ मालक यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:29 IST

Open in App

आयपीएलमधील लखनऊ सुपर जाएंट्सच्या संघाला दीड वर्षांनी गौतम गंभीरची रिप्लेसमेंट मिळाली आहे. झहीर खान या संघाचा मेंटॉर झालाय. याशिवाय लोकेश राहुलचं काय होणार? तोच संघाची कॅप्टन्सी करताना दिसणार की, संघ त्याला रिलीज करणार? हा मुद्दाही चर्चेत होता. यासंदर्भात LSG संघ मालक गोएंका यांनी आपले मत मांडले आहे.   

 नव्या नियमानंतर LSG पक्की करणार खेळाडूंच्या रिटेन-रिलीजची यादी  

संजीव गोएंका यांना लखनऊच्या ताफ्यातील रिटेन आणि रिलीज करण्यात येणाऱ्या खेळाडूंसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. LSG संघातील खेळाडू रिटेन रिलीज करण्यासंदर्भातील संदर्भातील मुद्यावर गोएंका म्हणाले की, यासंदर्भातील निर्णय घेण्यास अजून वेळ आहे. बीसीसीआयने रिटेन्शन नियमावली जाहीर केल्यानंतर त्यावर विचार करू. याशिवाय लोकेश राहुलसंदर्भात निर्माण झालेल्या या प्रश्नावरही संजीव गोएंका यांनी आपलं मत व्यक्त केले. 

KL राहुलचं काय?

आयपीएल २०२४ च्या हंगामात लखनऊ सुपर जाएंट्स संघाचे मालक संजीव गोएंका यांनी भर मैदानात लोकेश राहुलवर संताप व्यक्त केला होता. हा मुद्दा चांगलाच गाजला होता. यामुळेच लोकेश राहुल पुन्हा या संघाकडून खेळताना दिसणार का त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार यासंदर्भात चांगलीच चर्चा रंगताना दिसते. संघ मालकांनी या मुद्यावरही आपली भूमिका सांगितली. क्रिकेटर लोकेश राहुलसोबत 'ऑल इज वेल' सीन असल्याची गोष्ट त्यांनी बोलून दाखवलीये. केएल राहुल हा एलएसजी कुटुंबाचा भाग आहे. पण कॅप्टन्सी आणि संघ रिटेनशन यासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी अजून वेळ आहे. असे गोएंका यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्टार क्रिकेटरवर लिलावात उतरण्याची वेळ येणार की, त्याला संघ कायम करणार हा संभ्रम मात्र कायम आहे.   

झहीरच्या मार्गदर्शनाखाली लोकेश राहुलच कॅप्टन?

आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी मेगा लिलाव होणार आहे. त्याआधी लखनऊच्या संघाने झहीर खानला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात गेल्यापासून ही जागा रिक्त होती. लोकेश राहुल संघाचा अविभाज्य भाग आहे, असे सांगत त्याला कायम ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करत असल्याचे संकेत मालकांनी दिले आहेत. पण कॅप्टन्सीचा मुद्दा गुलदस्त्यातच आहे. त्याला संघात कायम ठेवून  पुन्हा कॅप्टन्सीची जबाबदारी त्याच्याकडे देणार की, नवा चेहरा त्याची जागा घेणार ते पाहण्याजोगे असेल. 

टॅग्स :लोकेश राहुलआयपीएल २०२४लखनौ सुपर जायंट्स