Join us

KKR vs SRH: सलामीवीरांचा फ्लॉप शो! रिंकूसह महागडा गडी पेटला; KKR नं पहिल्यांदाच गाठला २०० चा आकडा

कोलकाताच्या संघानं यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच २०० धावांचा आकडा गाठल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 21:51 IST

Open in App

IPL 2025 KKR vs SRH 15th Match :  आयपीएलच्या १८ व्या हंगामातील १५ व्या सामन्यात घरच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सच्या  संघानं निर्धारित २० षटकात २०० धावा केल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर क्विंटन डी कॉक आणि सुनील नरेन या जोडीनं कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या डावाची सुरुवात केली. पण दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी फिरले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अजिंक्य रहाणे- रघुवंशीनं सावरला डाव  

अवघ्या १६ धावांवर दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. संघ अडचणीत असताना कर्णधार अजिंक्य रहाणेनं २७ चेंडूत ३८ धावांची खेळी करत तिसऱ्या विकेटसाठी युवा अंगकृष्ण रघुवंशीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. या जोडीमुळे कोलकाताचा संघ पहिल्या दोन धक्क्यातून सावरला. अजिंक्य रहाणे तंबूत परतल्यावर अंगकृष्ण रघुवंशीनं अर्धशतकी खेळी केली.  

IPL 2025 : Kamindu Mendis नं दोन्ही हातांनी गोलंदाजी करण्याचं कसब दाखवलं; अन् विकेटही घेतली (VIDEO)

महागडा गडी तापला अन् रिंकू सिंहची फटकेबाजीही दिसली

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारा व्यंकटेश अय्यरने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात आपल्या फटकेबाजीची झलक दाखवून दिली. तो फॉर्ममध्ये आल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला मोठा दिलासाच मिळाला आहे. व्यंकटेश अय्यरनं २९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २९ चेंडूत २०६.९० च्या स्ट्राइक रेटनं ६० धावा कुटल्या. याशिवाय रिंकू सिंहच्या भात्यातूनही १७ चेंडूत ३२ धावांची खेळी आली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार आणि १ षटकार मारला. रघुवंशीच्या अर्धशतकानंतर व्यंकटेश अय्यर आणि रिंकून केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच २०० धावांचा आकडा गाठला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्ससनरायझर्स हैदराबादइंडियन प्रीमिअर लीगअजिंक्य रहाणेवेंकटेश अय्यर