Quinton De Kock KKR vs RR : गुवाहाटीच्या मैदानात रंगलेल्या राजस्थान विरुद्धच्या सामन्यात क्विंटन डिकॉक हा कोलकाता संघाचा हिरो ठरला. फलंदाजांसाठी आव्हानात्मक असलेल्या खेळपट्टीवर सर्वोत्तम फलंदाजीचा नजराणा पेश करत त्याने ९७ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं ८ विकेटसह सामना जिंकत यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
क्विंटन डिकॉकनं साधला मोठा डाव
अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चरनं वाइड चेंडू टाकला नसता तर कदाचित क्विंटन डिकॉकनं शतकी डावही साधला असता. पण ते काही शक्य झाले नाही. शतकाची संधी हुकली असली तरी दक्षिण आफ्रिकेच्या स्टार क्रिकेटरनं एक मोठा डाव साधला. धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आता क्विंटन डिकॉकच्या नावे झाला आहे. याआधी हा विक्रम एका भारतीय फलंदाजाच्या नावे होता.
Quinton De Kock Smart Catch : नया है यह! क्विंटन डीकॉकनं आधी हेल्मेट काढलं, मग कॅचवर गेला अन्...
११ वर्षांपूर्वी भारतीय खेळाडूनं सेट केलेला रेकॉर्ड मोडला राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या लढतीत क्विंटन डिकॉकनं ६१ चेंडूत ९७ धावांची नाबाद खेळी केली. त्याची ही खेळी ८ चौकार आणि ६ षटकारांनी बहरलेली होती. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. या खेळीसह त्याने ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून सर्वाधिक धावा ठोकण्याचा विक्रम आता त्याच्या नावे झाला आहे. याआधी हा विक्रम भारतीय बॅटर मनीष पांडेच्या नावे होता. मनीष पांडेनं २०१४ च्या हंगामात पंजाबविरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून ९४ धावांची खेळी केली होती.
धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- क्विंटन डिकॉक- ९७ धावा, २०२५
- मनीष पांडे- ९४ धावा, २०१४
- क्रिस लीन- ९३ धावा, २०१७
- मानविंदर बिस्ला- ९२ धावा, २०१३
- गौतम गंभीर- ९० धावा, २०१६