शाहरुख खानच्या मालकीचा अन् गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स संघ गेल्या काही हंगामापासून एका खास मास्टर प्लॅनसह मैदानात उतरताना दिसते. १२-१३ वर्षांपासून संघाचा भाग असलेल्या सुनील नरेन हा या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू KKR च्या ताफ्यातून खेळत आहे. मिस्ट्री स्पिनर गोलंदाजीसह आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. गत हंगामात १५ सामन्यात ४८८ धावा आणि १७ विकेट्स घेत त्याने संघाला चॅम्पियन करण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"जा नरेन जा, जी ले अपनी जिंदगी..."
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातही तो संघासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतोय. गोलंदाजीशिवाय सुनील नरेन याच्याकडून संघाला दमदार सुरुवात करून देण्याची मोठी आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. आयपीएल असो नाहीतर अन्य कोणतीही स्पर्धेत सलामीवीराकडून उत्तम सुरुवात करून देण्याची अपेक्षा असतेच. पण सुनील नरेनसंदर्भातील पॅटर्न जरा वेगळा आहे. डावाची सुरुवात करातना विकेट टिकवून ठेवण्याचा दबाव त्याच्यावर अजिबात नाही. "जा नरेन जा, जी ले अपनी ज़िंदगी..." या डायलॉगसह संघ व्यवस्थापनाने त्याला बिनधास्त अंदाजात फटकेबाजी करण्याची मुभा दिलीये. ही गोष्ट शाहरूख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी फायद्याची ठरताना दिसते.
IPL 2025 MI vs RCB : हिटमॅनचा फ्लॉप शो कायम! रितिकाचा चेहरा पडला; 'विराट' सेलिब्रेशनही चर्चेत
हिटमॅन रोहित शर्माचा अप्रोचही असाच, पण पण सुनील नरेनचा पॅटर्नच जरा वेगळा!
भारतीय संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा हा सध्या त्याच्या फ्लॉप शोमुळे चर्चेत आहे. मुळात त्याचा अप्रोचही जायचं अन् मोठी फटकेबाजी करून सामना संघाच्या बाजून सेट करायचा असाच आहे. पण तो स्पेशल बॅटर असल्यामुळे त्याची विकेट पडली की, ताफ्यात थोडे टेन्शन निर्माण होते. त्याचा अप्रोच संघाला रिस्क झोनमध्ये नेणारा ठरतो. हीच गोष्ट अन्य फ्रँचायझीच्या सलामीवीरांमध्येही तुम्हाला पाहायला मिळेल. पण सुनील नेरनचा पॅटर्नच वेगळाय. फलंदाजीत स्वस्तात बाद झाला तरी तो गोलंदाजीत उपयुक्त कामगिरी करु शकतो. त्याच्या बॅटमधून येणाऱ्या धावा या बोनस स्वरुपात असतात. त्यामुळे तो शून्यावर जरी माघारी फिरला तरी त्याचा संघाच्या एकंदरीत प्लॅनिंगवर फारसा परिणाम होत नाही.
KKR कडे 'नरेन पॅटर्न'चा बॅकअप प्लॅनही तयार
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं मागील काही हंगामात सलामीचे अनेक प्रयोग करुन सुनील नरेन पॅटर्न पक्का केलाय. तो संघासाठी फायद्याचाही ठरतो. आता तो नसला तर काय? या प्रश्नाच उत्तरही केकेआरकडे तयार आहे. यंदाच्या हंगामात सुनील नरेन एका सामन्याला मुकला त्यावेळी त्यांनी बॅकअप प्लॅन तयार असल्याचेही दाखवून दिले. त्याच्या जागी संघात आलेल्या मोईन अलीवर संघाने नरेनची जबाबदारी सोपवली. त्यामुळे SRK च्या KKR चा हा एक मास्टर प्लॅनच असल्याचे सिद्ध होते.
सुनील नरेनची यंदाच्या हंगामातील कामगिरी