IPL 2025 : चेंडू लपवून 'विकेट कलेक्टर'ची स्टाइल कॉपी करणारा LSG च्या ताफ्यातील 'तिकीट कलेक्टर'

इथं जाणून घेऊयात चेंडू लपवून 'विकेट कलेक्टर'ची कॉपी करत मैदानात 'तिकीट कलेक्टर'च्या अंदाजात मिरवणाऱ्या फिरकीपटूसंदर्भातील खास स्टोरी

By सुशांत जाधव | Updated: April 8, 2025 13:24 IST2025-04-08T13:21:53+5:302025-04-08T13:24:56+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KKR vs LSG 21st Match Lokmat Player to Watch Digvesh Singh Rathi Lucknow Super Giants | IPL 2025 : चेंडू लपवून 'विकेट कलेक्टर'ची स्टाइल कॉपी करणारा LSG च्या ताफ्यातील 'तिकीट कलेक्टर'

IPL 2025 : चेंडू लपवून 'विकेट कलेक्टर'ची स्टाइल कॉपी करणारा LSG च्या ताफ्यातील 'तिकीट कलेक्टर'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 KKR vs LSG 21st Match Player to Watch Digvesh Singh Rathi : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक नवे चेहरे चर्चेत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे दिग्वेश सिंह राठी. दिल्लीचा लोकल बॉय रिषभ पंतच्या लखनौ सुपर जाएंट्स संघाकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा लेग स्पिनर आयपीएल पदार्पणातील हंगामात आपल्या कामगिरीशिवाय विकेट मिळवल्यावर करत असलेल्या सेलिब्रेशनमुळे लक्षवेधी ठरलाय. इथं जाणून घेऊयात चेंडू लपवून 'विकेट कलेक्टर'ची कॉपी करत मैदानात 'तिकीट कलेक्टर'च्या अंदाजात मिरवणाऱ्या फिरकीपटूसंदर्भातील खास स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

या मिस्ट्री स्पिनरला मानतो आपला आदर्श; चेंडू लपवून करतो त्याची कॉपी

दिग्वेश राठी हा दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून आयपीएलमध्ये एन्ट्री मारणारा गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातून खेळणाऱ्या मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनला तो आदर्श मानतो. त्यामुळेच त्याच्या गोलंदाजीत कॅरेबियन स्टारची झलक दिसून येते. चेंडू लपवून गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकवा देण्याचं आपल्यातील कसब तो दाखवून देताना दिसते.  भारताच्या २५ वर्षीय अनकॅप्ड गोलंदाजाने आयपीएलमध्ये आपल्यातील मिस्ट्री स्पिनरची झलक दाखवूनही दिलीये. 

IPL 2025 : "जा नरेन जा, जी ले अपनी ज़िंदगी..." SRK च्या KKR चा मास्टर प्लॅन

पहिली आयपीएल विकेटमध्येच दिसली त्याच्या फिरकीतील कमालीची जादू

आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात आपल्या दुसऱ्या षटकात अक्षर पटेलच्या रुपात आयपीएलमधील पहिली विकेट घेतली. ही विकेट घेताना पहिला चेंडू त्याने वळवला. मग दुसऱ्या चेंडू स्किड करत (बॅटवर येण्याऐवजी चेंडू खालच्या दिशेनं फिरणे) त्याने अक्षर पटेलला आश्चर्यचकित केले. त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू टाकत त्याने अक्षर पटेलला आपल्या जाळ्यात अडकवल्याचे पाहायला मिळाले होते. आयपीएलमधील पहिली विकेट घेताना त्याने आपल्या गोलंदाजीतील जादूई अंदाजाचे दर्शन घडवले आहे. ही विकेट घेतल्यावर तो फुटबॉल स्टार नेमारच्या अंदाजात सेलिब्रेशन करताना दिसले. पण त्यानंतर त्याने हटके अंदाजातील सेलिब्रेशनने लक्षवेधून घेतले. ज्याची किंमतही त्याला मोजावी लागली.

विकेट घेतल्यावर 'तिकीट कलेक्टर'च्या तोऱ्यात मिरवतो

पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने प्रियांश आर्य याची विकेट घेतल्यावर केलेल्या सेलिब्रेशनमुळे तो चर्चेत आला. प्रियंशची विकेट घेतल्यावर राठीनं एका हाताची नोटबूक करून दुसऱ्या हाताला लेखनी करत विकेट आपल्या खात्यात जमा केल्याचा इशारा त्याने केला. बॅटरसमोर ही कृती केल्यामुळे त्याच्यावर कारवाईही झाली. पण त्यानंतरही त्याने आपला हा अंदाज कायम ठेवला. वादात सापडू नये यासाठी त्याने फलंदाजासमोर हे करणं टाळल्याचे दिसले. LSG चा कॅप्टन रिषभ पंतने तर  सेलिब्रेशनच्या अंदाजावरून त्याला 'तिकट कलेक्टर' असे नाव दिल्याचे पाहायला मिळाले. विकेट मिळवल्यावर तो ज्या अंदाजात मिरवतो ते एखाद्या तिकट कलेक्टर प्रमाणेच दिसतो. कोलकाता विरुद्धच्या सामन्याआधी दिग्वेश राठीला तो ज्या सुनील नरेनला आदर्श मानतो त्याला भेटण्याची संधी मिळाली. यावेळी LSG कर्णधार पंतनं नरेन हा 'विकेट कलेक्टर' अन् राठी हा 'तिकीट कलेक्टर' असल्याची मजेशीर कमेंट केल्याचे पाहायला मिळाले. 

राठी करत असलेले 'नोटबूक स्टाइल' सेलिब्रेशन काही नवं नाही, जाणून घ्या यामागचं विराट कनेक्शन

२०१७ मध्ये कॅरेबियन ताफ्यातील केस्रिक विल्यम्स (Kesrick Williams) याने विराट कोहलीची विकेट घेतल्यावर नोटबूक स्लेजिंग सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर २०१९ मध्ये विराट कोहलीनं केस्रिक विल्यम्सची धुलाई करत हिशोब चुकता करताना नोटबूक स्टाइल सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते. LSG च्या ताफ्यातील पूरन याने ज्यावेळीला राठीला सुनील नरेन असं सेलिब्रेशन करत नाही असे म्हटले त्यावेळी त्याला एका शब्दांत रिप्लाय देतान राठीनं मी दिल्लीकर असल्याचे म्हटल्याचेही पाहायला मिळाले होते. त्याची ही  कमेंट विराट सेलिब्रेशनच्या आठवणीला उजाळा देणारी अशीच आहे.
 

Web Title: IPL 2025 KKR vs LSG 21st Match Lokmat Player to Watch Digvesh Singh Rathi Lucknow Super Giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.