IPL 2025 KKR vs LSG 21st Match Harshit Rana Bowled Aiden Markram : आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील २१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने इडन गार्डन्सच्या घरच्या मैदानात मैदानात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणेचा हा निर्णय लखनौ सुपर जाएंट्सच्या संघानं फोल ठरवला. एडन मार्करम आणि मिचेल मार्श जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून दिली. सलामी जोडी डोकेदुखी ठरत असताना हर्षित राणानं KKR च्या संघाला मोठा दिलासा दिला. त्याने मार्करमला अर्धशतकाच्या उंबरठ्यावर तंबूचा रस्ता दाखवला. लखनौ सुपर जाएंट्सच्या डावातील ११ व्या षटकात मार्करम क्लीन बोल्ड झाला. त्याने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हर्षिता राणानं आक्रमक अंदाजात व्यक्त केला आनंद
LSG च्या डावातील ११ व्या षटकात हर्षित राणा आपले वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारत मार्करमनं त्याचे स्वागत केले. पण पुढच्या चेंडूवर हर्षित राणानं चौकाराचा हिशोब चुकता केला. स्लोवर बॉवर मार्करमला चकवा देत त्याने त्याला क्लीन बोल्ड करत तंबूचा रस्ता दाखवला. त्याची विकेट घेतल्यावर हर्षित राणाचा तोरा बघण्याजोगा होता. हातवारे करत चल नीघ आता..अशा अंदाजात केकेआरच्या जलगती गोलंदाजाने आक्रमक अंदाजात विकेट्सचा आनंद साजरा केला.
IPL 2025 : "जा नरेन जा, जी ले अपनी ज़िंदगी..." SRK च्या KKR चा मास्टर प्लॅन
मार्करम-मिचेल जोडीची दमदार भागीदारी
लखनौच्या संघाला दमदार सुरुवात करून देताना मार्करमनं मिचेल मार्शच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. ६२ चेंडूत केलेली ही भागीदारी लखनौच्या संघाचा पाया भक्कम करून २०० पार टार्गेट सेट करण्यासाठी उपयुक्त ठरणारी अशीच आहे. दुसरीकडे हर्षित राणा हा नेहमीच त्याच्या आक्रमक अंदाजातील सेलिब्रेशनमुळे चर्चेत असतो. आयपीएलमध्ये फ्लाइंग किस सेलिब्रेशनमुळे त्याच्यावर बंदीची कारवाईही झाली आहे. पुन्हा त्याने आक्रमक अंदाजाने लक्ष वेधले.