Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants, 21st Match : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जाएंट्स संघाने ४ धावांनी विजय नोंदवला.उच्च धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाने तगडी टक्कर दिली. अजिंक्य रहाणेच्या कडक फिफ्टीनंतर अखेरच्या षटकात रिंकू सिंहची फटकेबाजी पाहायला मिळाले. त्याने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटसह १५ चेंडूत नाबाद ३८ धावा कुटल्या. पण तरीही कोलकाता संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. रिंकू सिंहची लेट एन्ट्री झाली. त्यातही त्याने आपला तोरा दाखवला. पण कोलकाताचा पराभव तो टाळू शकला नाही. ३३८ धावांचा पाठलाग करताना कोलकाताच्या संघाला निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २३४ धावांपर्यंतच मजल मारता आली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धावांचा पाठलाग करताना KKR ची खराब सुरुवात, अजिंक्य- नरेन जोडीनं सावरला डाव
लखनौच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना मार्करम ४७ (२८), मिचेल मार्श ८१ (४८) आणि निकोलस पूरन ८७ (३६) या तिघांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर ३ विेकेट्सच्या मोबदल्या निर्धारित षटकात २३८ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाता संघाने क्विंटन डिकॉकच्या रुपात १५ (९) पहिली विकेट ३७ धावांवरच गमावली होती. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सुनील नरेन यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. सुनील नरेन १३ चेंडूत ३० धावांची स्फोटक खेळी करून माघारी फिरला.
PL 2025 KKR vs LSG : ईडन गार्डन्सच्या मैदानात घोंगावलं निकोलस पूरन अन् मिचेल मार्श नावाचं वादळ
अजिंक्य रहाणेची कडक फिफ्टी, व्यंकटेश अय्यरच्या भात्यातूनही पाहायला मिळाली फटकेबाजी
कर्णधार अजिंक्य रहाणे याने ३५ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. टी-२० कारकिर्दीतील त्याचे हे ५० वे अर्धशतक ठरले. त्याच्या खेळीशिवाय उप कर्णधार व्यंकटेश अय्यरनं २९ चेंडूत ४५ धावा करत संघाला विजयाच्या दिशेने नेणारी खेळी केली. अखेरच्या षटकात रिंकू सिंहने जोर लावला. त्याने १५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने नाबाद ३८ धावांची खेळी केली. पण कोलकाताच्या संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
पाचव्या सामन्यातील तिसऱ्या विजयासह लखनौच्या संघाने आपल्या खात्यात ६ गुण जमा केले असून गुणतालिकेत ते आता चौथ्या स्थानावर पोहचले आहेत. दुसऱ्या बाजूला कोलकाताचा संघाला पाचव्या सामन्यात तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. २ विजयासह ४ गुण त्यांच्या खात्यावर जमा असून गुणतालिकेत ते सहाव्या क्रमांकावर आहेत.
Web Title: IPL 2025 KKR vs LSG 21st Match Ajinkya Rahane Fifty Rinku Singh Hit Show But Lucknow Super Giants beat Kolkata Knight Riders By 4 Runs In High Scoring Contest
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.