Join us

KKR vs LSG : मॅच आधी आयडॉलची भेट; मग त्याची विकेट घेत पुन्हा नोटबूक स्टाइल सेलिब्रेशन (VIDEO)

आयडॉलची विकेट घेतल्यावरही तो आपले नोटबूक सेलिब्रेशन करायला विसरला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 21:36 IST

Open in App

Digvesh Singh Rathi Doing His Notebook Celebration : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठी पुन्हा एकदा आपल्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला. आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात तो कमालीची कामगिरी करताना दिसतोय. कोलकाताच्या मैदानातही त्याने आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली. ज्या ऑलराउंडरला तो आदर्श मानतो त्या सुनील नरेनच्या स्फोटक खेळीला त्याने ब्रेक लावला. आयडॉलची विकेट घेतल्यावरही तो आपले नोटबूक सेलिब्रेशन करायला विसरला नाही. पण यावेळी त्याचा अंदाज थोडा वेगळा होता. 

 आयडॉलची विकेट घेतल्यावर खास अंदाजात केलं सेलिब्रेशन 

कोलकाताच्या डावातील  ७ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दिग्वेश राठीने आपला आदर्श सुनील नारायणला बाद केले. राठीच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात सुनील नरेन एडेन मार्करामच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. ही विकेट घेतल्यानंतर दिग्वेश राठीने ग्राउंडवर आपल्या आयडॉलची विकेट घेतल्याची नोंद केल्याचे दृश्य पाहायला मिळाले. हटके स्टाइलमधील त्याचे नोटबुक सेलिब्रेशन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

तो सातत्याने आपल्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत

याआधी त्याने पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात प्रियांश आर्य याची विकेट घेतल्यावर त्याला खुन्नस देत याच तोऱ्यात सेलिब्रेशन केले होते. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातही त्याने असाच प्रकारे विकेट्सचा आनंद साजरा करताना पाहायला मिळाले होते. प्रियंश आर्याला नोटबूक स्टाईल स्लेज केल्यामुळे त्याच्यावर कारवाईही झाली. पण आता तो फलंदाजांपासून सुरक्षित अंतर ठेवून आपल्या सेलिब्रेशनचा जलवा दाखवून देताना दिसतोय.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५कोलकाता नाईट रायडर्सलखनौ सुपर जायंट्स