Dewald Brevis 1st IPL Fifty ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात धांवाचा पाठलाग करताना CSK च्या ताफ्यातील बेबी एबी बेबी अर्थात डेवॉल्ड ब्रेविस याने धमाकेदार इनिंग खेळली. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला पहिल्या षटकात विकेट मिळवून देणाऱ्या वैभव अरोराच्या एका षटकात त्याने चौकार षटकारांची बरसात केल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात त्याने २२ चेंडूत अर्धशतक साजरे केले. आयपीएलमधील त्याचे हे पहिले अर्धशतक आहे. ब्रेविसनं या सामन्यात २५ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५२ धावांची धमाकेदार खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
११ व्या षटकात चौकार-षटकारांची 'बरसात'
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना १७९ धावा करत चेन्नई सुपर किंग्जसमोर १८० धावांचे टार्गेट सेट केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. पहिल्या पाच षटकात ५६ धावांवर चेन्ई सुपर किंग्जच्या संघाने ४ विकेट्स गमावल्या होत्या. या परिस्थितीत फलंदाजीला आलेल्या ब्रेविसनं कमालीची फटकेबाजी करत शिवम दुबेच्या साथीनं चेन्नईच्या डावाला फक्त आकार दिला नाही तर सामना CSK च्या बाजूनं वळवणारी खेळी केली. चेन्नईच्या डावातील ११ व्या षटकात वैभव अरोराच्या गोलंदाजीवर त्याने ३ षटकार आणि ३ चौकारासह ३० धावा कुटल्या. यासह त्याने आयपीएलमधील पहिले अर्धशतकही पूर्ण केले.