IPL 2025 : जलदगती गोलंदाजांना नडतोय; पण फिरकीपटूंसमोर 'तलवार म्यान' करुन मागे सरतोय

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात तो फिरकीच चक्रव्यूव्ह भेदण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 12:37 IST2025-05-07T12:29:58+5:302025-05-07T12:37:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 KKR vs CSK 5th Match Lokmat Player to Watch Ajinkya Rahane Kolkata Knight Riders | IPL 2025 : जलदगती गोलंदाजांना नडतोय; पण फिरकीपटूंसमोर 'तलवार म्यान' करुन मागे सरतोय

IPL 2025 : जलदगती गोलंदाजांना नडतोय; पण फिरकीपटूंसमोर 'तलवार म्यान' करुन मागे सरतोय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 KKR vs CSK 5th Match Player to Watch Ajinkya Rahane Kolkata Knight Riders : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात टिकून राहण्यासाठी गत चॅम्पियन KKR साठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे हा संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असल्यामुळे नेतृत्वाशिवाय फलंदाजीत त्याच्याकडून संघाला मोठी अपेक्षा असेल. आता यंदाच्या हंगामात तो भारीये खेळलाय. पण फिरकीपटूंसमोर तो तलवार म्यान करताना दिसले आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात तो फिरकीच चक्रव्यूव्ह भेदण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जलदगती गोलंदाजांसमोर तोरात बॅटिंग, पण फिरकीपटूंसमोर कमी पडला 

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रहाणे फिरकीपटूंसमोर संघर्ष करताना दिसतोय. जलदगती गोलंदाजीसमोर १०४.५ च्या सरासरीसह १७४.१७ च्या सरासरीने  धावा काढणाऱ्या गड्याची फिरकीसमोर  सरासरीमध्ये १६.८६ एवढी घसरण झाली आहे. स्ट्राइक रेटचा आकडाही ११४.५६ इतका आहे. ११ सामन्यातील १० डावात त्याने फिरकीसमोर १०३ चेंडूत ११८ धावा काढल्या असून सात वेळा त्याने फिरकीपटूला आपली विकेट दिलीये. यात चार वेळा तो लेग स्पिनरच्या जाळ्यात अडकलाय. 

पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)

त्याची IPL च्या यंदाच्या हंगामातील कामगिरी

अजिंक्य रहाणेनं १० डावात ३६.३३ च्या सरासरीसह १४६ च्या स्ट्राइक रेटनं  ३२७ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश असून ६१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात ईडन गार्डन्सच्या मैदानातच त्याने ही कामगिरी केली होती. त्याच्या भात्यातून आलेली अन्य दोन अर्धशतके ही बंगळुरु  आणि गुजरात टायटन्स संघाविरुद्ध आली होती. तिन्हीच्या तिन्ही अर्धशतके त्याने ईडन गार्डन्सच्या मैदानात झळकावली आहेत. CSK विरुद्धचा सामनाही इथंच असून फिरकीचं चक्रव्यूव्ह भेदून संघाचे आव्हान कायम ठेवण्याचे चॅलेंजर कॅप्टन अजिंक्य रहाणेसमोर असेल.  

CSK विरुद्ध ही गोष्ट अजिंक्यसह KKR साठी जमेची बाजू

या आधी कोलकाताच्या संघाने चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्या घरच्या मैदानात ८ विके्टस राखून पराभूत केले आहे. एवढेच नाही तर या सामन्यात अजिंक्य रहाणे नाबाद राहिला होता. ही अजिंक्यसह केकेआरसाठी जमेची बाजू असेल. पण जड्डू आणि नूर या दोन डावखुऱ्यांसमोर अजिंक्य रहाणेचा कस लागू शकतो.
 

Web Title: IPL 2025 KKR vs CSK 5th Match Lokmat Player to Watch Ajinkya Rahane Kolkata Knight Riders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.