Josh Hazlewood RCB Fan Video IPL 2025: विराट कोहलीचा संघ RCB सध्या चांगल्या फॉर्मात आहे. यंदाच्या हंगामात त्यांनी दमदार फलंदाजी आणि गोलंदाजी करत प्लेऑफ्समध्ये आपले स्थान पक्के केले आहे. काही खेळाडूंची मध्यातून माघार आणि काही खेळाडूंच्या दुखापती यातून मार्ग काढत RCB चा संघ अप्रतिम कामगिरी करत आहे. RCB ला गेल्या १७ वर्षात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. पण यंदा IPL चे १८वे वर्ष आहे. विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर देखील १८ आहे. त्यामुळे यंदा RCB ट्रॉफी उंचावणार अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे चाहते प्रचंड उत्साहात आहेत. पण तसे असतानाच एका चाहत्याला मात्र नाराजी अनुभवावी लागली. हा प्रकार वेगवान ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेजलवूड संदर्भात घडला.
नेमकं काय घडलं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो हेझलवूडशी शेक-हँड म्हणजेच हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण हेजलवूडच्या वर्तणुकीमुळे तो चाहता निराश होतो. त्याचे कारण चाहता हेझलवूडच्या बाजूला असूनही हेजलवूड त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो. या अनुभवाने नाराज झालेल्या चाहत्याने व्हिडीओ पोस्ट करत सांगितले, की त्याने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाला हस्तांदोलन करण्याची आणि ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. पण त्याला काहीही मिळाले नाही. दोन्ही गोष्टींसाठी हेजलवूडने नकार दिला. त्यावरून चाहता म्हणाला की, RCBच्या प्रत्येक चाहत्याला खेळाडूंकडून चांगलाच अनुभव मिळेल असे नाही. पण काहीही घडले तरीही मी RCB चा चाहता आणि कायम असेन. हेझलवूडला RCBकडून खेळताना पाहण्याची मी वाट पाहत आहे.
दरम्यान, जोश हेजलवूडने यंदाच्या हंगामात RCB साठी खूप चांगली कामगिरी केली आहे. पण खांद्याच्या दुखापतीमुळे ९ मे रोजी हेजलवूडने RCBचा कॅम्प सोडला आणि तो ऑस्ट्रेलियाला परतला. तेथे तो उपचार घेत होता. ऑपरेशन सिंदूननंतर IPL पुन्हा सुरु झाले आणि हेजलवूड भारतात आला. पण तो अद्याप संघात खेळताना दिसलेला नाही. तसेच, त्याच्या फिटनेसबाबतही काहीसे प्रश्नचिन्ह असल्याचे दिसत आहे.
Web Title: IPL 2025 Josh Hazlewood disappoints RCB fan ignores his request of selfie and autograph video viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.