Join us

IPL 2025 : टी-२० तील किंग! 'करामती' खान ४ वेळा 'पिक्चर'मध्ये आला; पण 'ब्लॉकबस्टर' शो नाही दिसला

राशीद खानला तोड नाही, पण यंदाच्या हंगामात पहिल्या चार सामन्यात त्याची जादू दिसलीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:17 IST

Open in App

IPL 2025 GT vs RR 23rd Match Player to Watch Rashid Khan Gujarat Titans : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात टीम इंडियाचा प्रिन्स शुबमन गिल याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघ दमदार कामगिरी करताना दिसतोय. पण या ताफ्यातून खेळणाऱ्या टी-२० तील किंगचा 'ब्लॉकबस्टर' शो काही अजून दिसलेला नाही. आपण ज्या किंगबद्दल बोलतोय तो दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशीद खान.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टी-२० क्रिकेटमधील किंग

टी२० क्रिकेटमध्ये  जादुई फिरकीसह कमालीची कामगिरी नोंदवणाऱ्या राशीद खानला 'करामती' खान म्हणूनही ओळखले जाते. क्रिकेट जगतातील वेगवेगळ्या लीगमध्ये खेळताना त्याने आपल्यातील धमक दाखवून दिलीये. सध्याच्या घडीला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच त्याने ६३१ विकेट्स घेणाऱ्या ड्वेन ब्रावोला मागे टाकून टी-२० तील किंग झालाय. टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात ६३५ विकेट्स जमा आहेत.   

IPL 2025: धोनीच्या CSK ला हरवल्यानंतर श्रेयस अय्यरने केला मोठा पराक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे

राशीद खानला तोड नाही

२०१७ ते २०२४ या कालावधीत राशीद खान कमालीची कामगिरी करून दाखवलीये. सातत्याने आपल्या गोलंदाजीतील जादू दाखवून देत सलग ८ कॅलेंडर ईयरमध्ये तो ५० पेक्षा अधिक विकेट घेण्याचा खास पराक्रमही त्याने करून दाखवलाय. अन्य कोणत्याही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. २०१८ मध्ये राशीद खान याने ९६ विकेट्स घेतल्या होत्या. एका कॅलेंडर ईयरमध्ये कोणत्याही गोलंदाजाने केलेली ही सर्वोच्च कामगिरी आहे. त्याच्यापाठोपाठ यादातीत ड्वेबन ब्रावो आहे. त्याने २०१६ मध्ये ८७ विकेट्स घेतल्या होत्या. ही आकडेवारी राशीद खानला टी-२० क्रिकेटमध्ये तोड नाही 

टी-२० मध्ये  हॅटट्रिकचा 'चौकार'

राशीद खान हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा हॅटट्रिकचा डाव साधणारा गोलंदाज आहे. बिग बॅश लीग, कॅरेबियन लीग आणि आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात अफगाणिस्तानकडून हॅटट्रिकचा पराक्रम करणाऱ्या राशीद खानने गुजरात टायटन्सच्या संघाकडून २०२३ च्या हंगामात कोलकाता विरुद्ध हॅटट्रिकचा डाव साधत छोट्या फॉर्मेटमध्ये मोठ्या पराक्रमासह वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला होता. 

IPL च्या यंदाच्या हंगामात 'ब्लॉकबस्टर' शो कधी दिसणार?

टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या राशीद खानने यंदाच्या हंगामातील ४ सामन्यात फक्त एक विकेट घेतली आहे. या विकेटसह त्याने १२५ सामन्यात आयपीएलमध्ये १५० विकेट्सचा टप्पा पार केला आहे. आता उर्वरित सामन्यात तो आपली छाप सोडून ब्लॉक बस्टर शो कधी दाखवणार ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५गुजरात टायटन्सराजस्थान रॉयल्सइंडियन प्रीमिअर लीग