अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यातून पंजाब किंग्जकडून पुन्हा एकदा घरवापसी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची यंदाच्या हंगामाची सुरुवात निराशजन झालीये. अझमतुल्लाह ओमरझाईच्या रुपात पंजाबच्या संघानं तिसरी विकेट गमावल्यावर तो मैदानात उतरला. पण साई किशोरनं त्याला आल्या पावली माघारी धाडले. या सामन्यातील गोल्डन डकसह त्याच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलच्या इतिहासाता सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम त्याच्या नावे झालाय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मॅक्सवेलवर ओढावली IPL च्या इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याची नामुष्की
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात १९ व्या वेळी ऑस्ट्रेलियन धडाकेबाज बॅटरच्या पदरी भोपळा पदरी पडला आहे. या यादीत दोन भारतीय बॅटर्सचा समावेश आहे. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स ताफ्यातून खेळणाऱ्या रोहित शर्मावर १८ वेळा शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय माजी क्रिकेटरर दिनेश कार्तिकही आयपीएलच्या इतिहासात १८ वेळा शून्यावर बाद झाला आहे.
आल्या आल्या रिव्हर्स शॉटचा नाद केला अन् वाया गेला
ग्लेन मॅक्सवेल हा तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तिसरी विकेट पडल्यावर मैदानात उतरल्यावर समोरच्या गोलंदाजाला समजून घेण्याआधी आल्या आल्या त्याने रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला. चुकीच्या वेळी चुकीचा फटका मारण्याची किंमत त्याला विकेटच्या रुपात मोजावी लागली.