IPL 2025 GT vs MI : मुंबई इंडियन्सची पाटी कोरी! पुन्हा एकदा घरच्या मैदानात गुजरात टायटन्स संघ ठरला भारी!

मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, अजून एकाच्याही भात्यातून आली नाही फिफ्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 23:41 IST2025-03-29T23:38:34+5:302025-03-29T23:41:11+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 GT vs MI Shubman Gill Lead Gujarat Titans Won By 36 Runs Against Hardik Pandya Mumbai Indians And Earn First 2 Points In This Season | IPL 2025 GT vs MI : मुंबई इंडियन्सची पाटी कोरी! पुन्हा एकदा घरच्या मैदानात गुजरात टायटन्स संघ ठरला भारी!

IPL 2025 GT vs MI : मुंबई इंडियन्सची पाटी कोरी! पुन्हा एकदा घरच्या मैदानात गुजरात टायटन्स संघ ठरला भारी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Gujarat Titans vs Mumbai Indians, 9th Match : अहमदाबादच्या घरच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल स्पर्धेतील नवव्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघानं पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला पराभूत करून दाखवलंय.  या मैदानातील पहिल्या विजयासह यंदाच्या हंगामात विजयाचे खाते उघडण्यात मुंबई इंडियन्स संघ अपय़शी ठरला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे दोन संघ चौथ्यांदा समोरासमोर आले होते. सलग चौथ्यांदा गुजरातने घरच्या मैदानावर बाजी मारलीये.  गुजरात टायटन्सच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी नांगी टाकली. एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकवता आले नाही. सूर्यकुमार यादवनं केलेल्या ४८ धावा या संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. पहिल्या सामन्यातही एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकवता आले नव्हते.     

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

साई सुदर्शनच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं उभारली होती आव्हानात्म धावसंख्या

पहिल्यांदा फलंदाजी करताना साई सुदर्शन आणि शुबमन गिल या सलामी जोडीनं गुजरात टायटन्सच्या संघाला दमदारसुरुवात करुन दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली. शुबमन गिल ३८ धावा करून माघारी फिरल्यावर साई सुदर्शन याने बटलरच्या साथीनं दुसऱ्या  विकेटसाठी  ५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. बटलरनं २४ चेंडूत ३९ धावा करून माघारी फिरला. साई सुदर्शन याने ४१ चेंडूत केलेल्या ६३ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघानं निर्धारित २० षटकात ८ बाद १९६ धावां करत मुंबई इंडियन्ससमोर १९७ धावांचे टार्गेट सेट केले होते. 

IPL मधील सर्वात स्लो बॉल; वाट बघून चौकार मारल्यावर बटलरला आलं हसू (VIDEO)

MI च्या बॅटिंगचा पुन्हा फ्लॉप शो!

गुजरात टायटन्सच्या संघानं दिलेल्या १९७ धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन या जोडीनं मुंबईच्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्मानं पहिल्या षटकात दोन खणखणीत चौकार मारले. पण चौथ्या चेंडूवर सिराजनं त्याला क्लीन बोल्ड करत मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का दिला. रायन रिक्लटनची विकेटही सिराजनेच घेतली. सलामी जोडी स्वस्तात परतल्यावर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीनं डाव सावरला. पण विजयासाठी मैदानात शेवटपर्यंत थांबल यातील कुणालाच जमलं नाही. सूर्युकमार यादवनं २८ चेंडूत ४८ धावा केल्या. याशिवाय तिलक वर्माच्या ३६ चेंडूतील ३९ धावांची खेळी वगळता अन्य कुणाचीच बॅट तळपली नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकात १६० धावांपर्यंतच मजल मारू शकला. गुजरातच्या संघानं ३६ धावांनी हा सामना खिशात घालत आपल्या खात्यात दोन गुण जमा केले.

 

Web Title: IPL 2025 GT vs MI Shubman Gill Lead Gujarat Titans Won By 36 Runs Against Hardik Pandya Mumbai Indians And Earn First 2 Points In This Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.