IPL 2025 : मॅच फिनिशरचे तेवर नाही दिसले! ७ डावात 'डायमंड' अन् 'गोल्डन डक'सह ३ वेळा पदरी पडला भोपळा!

मोजक्या सामन्यात बॅटिंगची संधी आली त्यावेळी GT च्या ताफ्यातील मॅच फिनिशरला जुने तेवर दाखवता आलेले नाहीत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 16:04 IST2025-05-22T16:00:13+5:302025-05-22T16:04:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2025 GT vs LSG 64th Match Lokmat Player to Watch Rahul Tewatia Gujarat Titans | IPL 2025 : मॅच फिनिशरचे तेवर नाही दिसले! ७ डावात 'डायमंड' अन् 'गोल्डन डक'सह ३ वेळा पदरी पडला भोपळा!

IPL 2025 : मॅच फिनिशरचे तेवर नाही दिसले! ७ डावात 'डायमंड' अन् 'गोल्डन डक'सह ३ वेळा पदरी पडला भोपळा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2025 GT vs LSG 64th Match Player to Watch Rahul Tewatia Gujarat Titans आयपीएलच्या १८ व्या हंगामात गुजरात टायटन्सचा संघ कमालीची कामगिरी करताना दिसतोय. संघाच्या आतापर्यंतच्या यशस्वी प्रवासात फलंदाजीत तिघांनी खास छाप सोडलीये. गिल आणि साईनं डावाला दमदार सुरुवात करून देताना दिसले. त्यानंतर मध्यफळीत बटलरनं आपला क्लास दाखवला. तिघांच्या सातत्यपूर्ण खेळीमुळे लोअर मिडल ऑर्डरवर तसा फारसा लोड आलेला नाही. पण मोजक्या सामन्यात बॅटिंगची संधी आली त्यावेळी GT च्या ताफ्यातील मॅच फिनिशरला जुने तेवर दाखवता आलेले नाहीत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

मॅच फिनिशरचा तोरा अजून नाही दिसला

लोअर मिडल ऑर्डरमध्ये राहुल तेवतियाचा याच्यावर संघाची मोठी जबाबदारी आहे. मॅच फनिशरच्या रुपात ओळखल्या जाणाऱ्या राहुल तेवतियाने आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यात ७ वेळा बॅटिंग केलीये. पण एका सामन्यात २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटललेल्या धावांशिवाय तो आपल्यातील जुने तेवर दाखवण्यात कमी पडल्याचे पाहायला मिळाले. इथून पुढच्या सामन्यात त्याला ही उणीव भरून काढण्याचे चॅलेंज असेल. इथं एक नजर टाकुया राहुल तेवितियाच्या आयपीएलमधील कामगिरीवर 

१२ सामन्यातील ७ डावात ६७ धावा! त्यातही  'डायमंड' अन् 'गोल्डन डक'सह तीन वेळा भोपळा

राहुल तेवतियावर पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग मिळाली. या सामन्यात एक षटकार मारून तो २ रन आउटच्या रुपात आउट झाला होता. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर डायमंड डकची नामुष्की ओढावली. एकही चेंडू न खेळता तो शून्यावर रनआउट झाला. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने १२ चेंडूत नाबाद २४ धावा करत आपले तेवर दाखवले. पण त्यानंतर लखनौ विरुद्धच्या सामन्यात तो खातेही न उघडता पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी फिरला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध २३ चेंडूत नाबाद ११ धावांची खेळी केल्यावर कोलकातासमोर त्याच्या पदरी पुन्हा भोपळा पडला.  मागच्या दोन सामन्यात राजस्थान आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्याने अनुक्रेम ९ आणि ६ धावा केल्या. १२ सामन्यातील ७ डावात त्याने १९१.४३ च्या स्ट्राइक रेटसह ६७ धावा कुटल्या असल्या तरी त्याचे जुने तेवर अजून दिसलेले नाहीत. यंदाच्या हंगामातील उर्वरित सामन्यात तो आपल्यातील पॉवर दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.

IPL 2025 : टी-२० त नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड! LSG च्या ताफ्यातून हा पठ्ठ्या ठरला पंतपेक्षा भारी


शंभरहून अधिक सामन्यात एक फिफ्टी, पण...

राहुल तेवतियानं २०१४ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्या पाच हंगामात त्याला फारशी संधी मिळाली नाही. पण २०२० च्या हंगामात १४ सामने खेळताना त्याच्या भात्यातून आयपीएलमध्ये पहिले अर्धशतकही आले. या एकमेव अर्धशतकासह त्याने आतापर्यंत खेळलेल्या १०५ सामन्यात १०८० धावा काढल्या आहेत. गुजरातशिवाय तो दिल्ली आणि राजस्थान फ्रँयायझी संघाकडून खेळताना दिसला आहे. शंभरहून अधिक सामने खेळून फक्त एक अर्धशतक खात्यात असले तरी छोट्याखानी खेळीसह मॅचला कलाटणी देण्याची क्षमता दाखवून देत त्याने आयपीएलमधील  सर्वोत्तम फिनिशरच्या रुपात आपली ओळख निर्माण केलीये. 
 

Web Title: IPL 2025 GT vs LSG 64th Match Lokmat Player to Watch Rahul Tewatia Gujarat Titans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.