Join us

GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका

अव्वलस्थानावर पोहचण्यासाठी गुजरातसमोर मोठं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 17:35 IST

Open in App

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात टॉपरचं स्वप्न बाळगून मैदानात उतरलेल्या गुजरात टायटन्स संघासमोर गुणतालिकेत तळाला असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने धमाकेदार बॅटिंगचा नजराणा पेश केला. आतापर्यंतच्या हंगामातील सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग असो वा धावांचा पाठलाग करायचा असो चेन्नई सुपर किंग्जचा संघ अडखळताना दिसला होता. पण अखेरच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने कमालीचे तेवर दाखवत गुजरात टायटन्स विरुद्धची लढाई २०० पारची केली आहे. सलामीवीर  डेवॉन कॉन्वेच्या अर्धशतकी खेळीनंतर डेवॉन ब्रेविसनं केलेल्या धमाकेदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २३० धावा केल्या आहेत. प्लेऑफ्समध्ये स्थान पक्के केलेल्या गुजरातच्या संघाला गुणतालिकेत टॉपला राहून क्वालिफायरमध्ये खेळायचे असेल तर २३१ धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवावा लागेल.      

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५इंडियन प्रीमिअर लीगचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स