IPL 2025 Final: आज IPL २०२५ चा अंतिम सामना रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB) आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज(PBKS) यांच्यात सुरू आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुमारे १ लाख ३२ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा सामना होतोय. यादरम्यान, युनिव्हर्सल बॉस म्हणजेच, ख्रिस गेलचा एक अनोखा फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये तो दोन्ही संघांना पाठिंबा देताना दिसतोय.
ख्रिस गेल आयपीएलचा अंतिम सामना पाहण्यासाठी आरसीबीच्या जर्सीमध्ये आला आहे, तर डोक्यावर पंजाबची पगडी घातली आहे. म्हणजेच, गेल या आज दोन्ही संघांना पाठिंबा देतोय. विशेष म्हणजे, गेलने आयपीएलमध्ये या दोन्ही संघांसाठी अनेक सामने खेळले आहेत.
ख्रिस गेलने KKR कडून खेळून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो आरसीबी आणि नंतर पंजाब किंग्जकडून खेळला. त्याने केकेआरसाठी १६ सामने, पंजाबसाठी ४१ आणि आरसीबीसाठी सर्वाधिक ८५ सामने खेळले आहेत. गेलच्या नावे आयपीएलमधील सर्वात मोठ्या खेळीचा (१७५*) विक्रम आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही गेलच्याच नावावर आहे.
Web Title: IPL 2025 Final: RCB Jersey and Punjab turbon; Chris Gayle fully supports both teams in IPL final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.