Join us

IPL 2025 DC vs SRH : स्टार्कचा 'पंजा'; फाफची फिफ्टी! 'बापू'च्या कॅप्टन्सीत दिल्लीचा जलवा

सनरायझर्स हैदराबादच्या संघानं दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं १६ व्या षटकात ७ गडी राखून सामना खिशात घातला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 19:33 IST

Open in App

IPL 2025 DC vs SRH 10th Match : इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या हंगामातील दहाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील आघाडीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.  मिचेल स्टार्कनं अर्धा संघ तंबूत धाडत या सामन्यात हवा केली.  सनरायझर्स हैदराबादचा संघ निर्धारित २० षटकेही खेळू शकला नाही.  १८.४ षटकात त्यांचा खेळ १६३ धावांत खल्लास झाला. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं १६ व्या षटकातच ७ गडी राखून विजय नोंदवला. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या हंगामातील हा सलग दुसरा विजय ठरला.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर सनरायझर्स हैदराबादचा पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा डाव फसला. डावातील पहिल्याच षटकात अभिषेक शर्मानं धावबादच्या स्वरुपात विकेट गमावली. ही विेकट एवढी महागात पडली की, त्यानंतर पॉवर प्लेमध्ये हैदराबादच्या संघानं ३७ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. अनिकेत वर्मानं केलेल्या ४१ चेंडूतील ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादच्या संघानं १६३ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना अनुभवी फलंदाज फाफ ड्युप्लेसीनं अर्धशतक झळकावलं.  गोलंदाजीत दिल्लीच्या संघाकडून स्टार्कनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय कुलदीप यादवला ३ तर मोहित शर्माला एक विकेट मिळाली.

Best Catch Of The Season : ...अन् अनिकेतचा 'हिट शो' थांबण्यासाठी जेक फ्रेझर-मॅकगर्क झाला 'सुपरमॅन'

फाफची फिफ्टी; केएल राहुलनंही ३०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

या धावांचा पाठलाग करताना जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि फाफ ड्युप्लेसी या जोडीनं दिल्ली कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचत हैदराबादच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. हैदराबाद संघाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या झीशान अन्सारी याने दिल्लीची सलामी जोडी फोडली.  फाफ ड्युप्लेसी २७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५० धावा करून माघारी फिरला. जेक फ्रेझर-मॅकगर्क ३८ (३२) आणि लोकेश राहुल १५ (५) यांची विकेटही झीशानलाच मिळाली. त्यानंतर अभिषेक पोरेल ३४ (१८)* आणि ट्रिस्टन स्टब्स २१ (१४)* या जोडीनं दिल्ली संघाच्या विजयावर मोहर उमटवली.    

  

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५दिल्ली कॅपिटल्ससनरायझर्स हैदराबादइंडियन प्रीमिअर लीग