IPL 2025 DC vs SRH Jake Fraser McGurk Best Catch Of The Season : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या विशाखापट्टणम यांच्यात रंगलेल्या सामन्यात यंदाच्या हंगामातील फिल्डिंगचा सर्वोत्तम दर्जा पाहायला मिळाला. दिल्लीच्या ताफ्यात कॅप्टन अक्षर पटेलसह विपराज निगम आणि जेक फ्रेझर मॅकगर्कने सर्वोत्तम झेल घेत सर्वांचे लक्षवेधून घेतले. सनरायझर्स हैदराबादची आघाडीची फलंदाजी कोलमडल्यावर या ताफ्यातील भारतीय अनकॅप्ड खेळाडू अनिकेत वर्मानं सूत्रे आपल्या हाती घेतली. तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयपीएलमधील तिसऱ्या सामन्यात पहिलं अर्धशतक झळकावल्यावर अनिकेत वर्मा या सामन्यात शतकही पूर्ण करेल, असे वाटत होते. पण सनरायझर्स हैदराबादच्या डावातील १६ व्या षटकात तो सीमारेषेवर झेलबाद झाला. ४१ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह बहरलेल्या त्याच्या खेळीला ७४ धावांवर ब्रेक लागला. त्याचा हिट शो थांबवण्यासाठी जेक फ्रेझर-मॅकगर्क सुपरमॅन झाला. अनिकेतनं मारलेला फटका हा त्याच्या भात्यात सहा धावा देऊन जाईल, असेच वाटत होते. पण जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षणामुळे अनिकेतला तंबूत परतावे लागले. त्याचा झेल पाहून स्टेडियमवर सामना पाहणारे प्रेक्षकही आवाक झाल्याचे पाहायला मिळाले.
IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा!
जेक फ्रेझर-मॅकगर्कचा 'सुपरमॅन' अवतार सोशल मीडियावर होतोय ट्रेंड
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर आघाडीच्या फलंदाजांनी नागी टाकल्यावर सनरायझर्सचा संघ अडचणीत सापडला होता. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या अनिकेतचा अवघ्या ६ धावांवर झेल सुटला. मग त्याने जो काही तोरा दाखवला तो कमालीचा होता. आपल्या आयपीएल कारकिर्दीतील तिसऱ्याच सामन्यात त्याने मोठी खेळी करून संघाला संकटातून बाहेर काढले. तो ज्या तोऱ्यात खेळत होता ते पाहून हा युवा बॅटर आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक ठोकण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत होते. पण ज्या चुकीमुळे त्याची खेळी बहरली त्या फिल्डिंगच्या जोरावरच दिल्लीच्या संघानं त्याच्या खेळीला लगाम लावला. ही विकेट कुलदीपच्या खात्यात जमा झाली असली तरी या विकेटचे सर्व श्रेयस हे जेक फ्रेझर-मॅकगर्क यालाच जाते. सोशल मीडियावर या कॅचचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय.