Join us

IPL 2025 DC vs SRH : 'बाप'माणूस! केएल राहुलची नवी इनिंग; त्याच्यासाठी पहिला सामना असेल एकदम खास

यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून तो पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 05:57 IST

Open in App

IPL 2025 DC vs SRH 10th Match Player to Watch KL Rahul Delhi Capitals : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील १० वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. विशाखापट्टणमच्या मैदानात खेळवण्यात येणारा हा सामना दिल्लीच्या ताफ्यातील लोकेश राहुलसाठी अधिक खास असेल. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात लोकेश राहुल वेगवेगळ्या संघाकडून खेळताना दिसला आहे. यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून तो पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. बापमाणूस झाल्यावर त्याचा हा पहिला सामना असेल. त्यामुळे अनुभवी बॅटर नव्या संघासोबत नवी सुरुवात अविस्मरणीय करण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल.  याआधी लोकेश राहुल हा रॉयलल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जाएंट्स या संघाकडून खेळला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पाचव्या फ्रँचायझी संघाकडून मैदानात उतरणार केएल राहुल!

२०१३ मध्ये आरसीबीच्या ताफ्यातून आयपीएलची सुरुवात केल्यावर २०१४ ते १०१५ या हंगामात तो सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातून खेळताना दिसला. २०१८ ते २०२१ या हंगामात पंजाब किंग्जचे नेतृत्व केल्यावर २०२२ मध्ये तो आयपीएलमधील नवा संघ असलेल्या लखनौच्या ताफ्यात सामील झाला. गत हंगामापर्यंत तो या संघाचा कर्णधार राहिला. २०२४ च्या हंगामात लखनौ फ्रँचायझी संघाचे मालक संजीव गोएंका आणि लोकेश राहुल यांच्यातील भर मैदानात  कडवडपणाचे दृश्य दिसले अन् मग स्वाभिमान जपत १८ कोटींची ऑफर नाकारुन तो लिलावात उतरल्याचे पाहायला मिळाले. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने या अनुभवी विकेट किपर बॅटरला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.  

दिल्लीच्या ताफ्यातील सवंगड्यांनी केएल राहुलला हटके अंदाजात दिल्या शुभेच्छा (VIDEO)

नव्या संघानंही दिली कॅप्टन्सीची ऑफर, पण...

आयपीएलसह टीम इंडियाकडून खेळतानाचा तगडा अनुभव असल्यामुळे आपल्यासोबत नव्या हंगामाची सुरुवात लोकेश राहुलनं कर्णधारपदासह करावी, असे वाटत होते. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून त्याला ही ऑफर मिळाल्याची चर्चाही रंगली. पण फक्त खेळाडूच्या रुपात फ्रँचायझीकडून खेळायचे आहे, असे म्हणत त्याने ही ऑफर नाकारली होती. आता खेळाडूच्या रुपात तो संघाला कितपत योगदान देणार ते पाहण्याजोगे असेल. 

खास कारणामुळे पहिल्या सामन्याला मुकला 

दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं लखनौ जाएंट्स विरुद्धच्या लढतीनं यंदाच्या हंगामाला सुरुवात केली होती. पण या सामन्यात लोकेश राहुल मैदानात उतरला नव्हता. २४ मार्चला ज्या दिवशी दिल्ली कॅपिटल्सचा संघ मैदानात उतरला त्याच दिवशी केएल राहुल बाबा झाला. त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीनं आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला. या खास कारणामुळे त्याने पत्नीसोबत राहण्याला पसंती दिली. या दिवशी एका बाजूला लोकेश राहुलनं गोड बातमी आली दुसऱ्या बाजूला विशाखापट्टणमच्या मैदानात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकल्याची गोड बातमी दिली होती. आता नव्या संघाकडून पहिल्या सामन्यात तो कशी कामगिरी करणार त्यावर सर्वांच्या नजरा असतील. 

केएल राहुलची आयपीएलमधील कामगिरी

केएल राहुलनं आतापर्यंत लोकप्रिय आयपीएल स्पर्धेत १३२ सामने खेळले असून ४ शतकं आणि ३७ अर्धशतकासह त्याने ४६८३ धावा केल्या आहेत. नाबाद १३२ ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या आहे. २०२० च्या हंगामात पंजाबच्या ताफ्यातून खेळताना त्याने हंगाम गाजवला होता. या हंगामात सर्वाधिक ६७० धावा करत तो ऑरेंज कॅप विजेता ठरला होता. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लोकेश राहुलदिल्ली कॅपिटल्ससनरायझर्स हैदराबादइंडियन प्रीमिअर लीग