IPL 2025 DC vs RCB 46th Match Player to Watch Josh Hazlewood Royal Challengers Bengaluru इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून खेळताना जॉश हेजलवूड कमालीच्या गोलंदाजीसह संघाच्या यशात मोलाचे योगदान देताना दिसत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातही संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. या सामन्यात त्याला पर्पल कॅपच्या यादीतही आघाडीवर विराजमान होण्याची देखील संधी आहे. एक नजर जॉश हेजलवूडच्या यंदांच्या हंगामातील कामगिरीवर
९ सामन्यात घेतल्यात १६ विकेट्स
जॉश हेजलवूडनं आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यात ३२.५ षटके गोलंदाजी करताना २७५ धावा खर्च करत १६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यात एकदा त्याने ४ विकेट्सची कामगिरीही नोंदवली आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ३३ धावांत या ४ विकेट्स घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या यादीत प्रसिद्ध कृष्णा १६ विकेट्ससह उत्तम सरासरीच्या जोरावर अव्वलस्थानी आहे. दिल्ली विरुद्ध एक विकेट घेताच जॉश हेजलवूड पर्पल कॅपवर कब्जा करेल.
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
मोठ्या प्राइज टॅगसह तगडी कामगिरी
ऑस्ट्रेलियन जॉश हेजलवूडनं २०२० च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. २ कोटी प्राइज टॅगसह दोन हंगाम या संघाकडून खेळल्यावर २०२२ पासून तो आरसीबीच्या ताफ्यात आहे. मागील दोन हंगामात हेजलवूड ७.७५ कोटी रुपयांसह RCB कडून खेळल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामात RCB नं त्याच्यासाठी १२.५० कोटी एवढी मोठी रक्कम मोजली आहे. तो पैसा वसूल शो देखील दाखवून देत आहे.
३६ व्या सामन्यात साजरी केली फिफ्टी
आपल्या आयपीएल कारकिर्दीत हेजलवूडनं ३६ सामन्यात ५१ विके्स घेतल्या आहेत. २५ धावा खर्च करत ४ विकेट्स ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. यंदाच्या हंगामातील राजस्थान विरुद्धच्या सामन्यात सामन्याला कलाटणी देणाऱ्या स्पेलसह तो मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरीही ठरला. एवढेच नाही तर त्याने ३६ सामन्यात आयपीएलमध्ये अर्धशतकही पूर्ण केले.