Rohit Sharma On Jasprit Bumrah Karun Nair Controversy : दिल्लीच्या मैदानात मुंबई इंडियन्सच्या संघानं दिलेल्या २०० पार धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीच्या ताफ्यातून करूण नायर याने इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरून खास छाप सोडली. ३ वर्षांनी आयपीएलमध्ये कमबॅकची संधी मिळाल्यावर त्याने कडक फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टसह जसप्रीत बुमराहची अक्षरश: धुलाई केली. सामन्या दरम्यान बुमराह आणि नायर यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचेही पाहायला मिळाले. दोघांच्यात टक्कर झाली अन् बुमराह करूण नायरवर चिडला. मैदानात दोन खेळाडूंमध्ये रंगलेला दंगा बघताना रोहित शर्माची रिअॅक्शन चर्चेचा विषय ठरतीये.
बुमराह-नायर यांच्यात टक्कर
दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील पॉवर प्लेमधील अखेरच्या षटक हे जसप्रीत बुमराहने टाकले. या षटकात करूण नायरनं त्याच्या गोलंदाजीवर दोन षटकार आणि चौकार मारले. धाव घेताना करून नायर आणि बुमराह यांच्यात टक्कर झाली अन् मग वातावरण थोडे तापले. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील सहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर दोन धावा घेत नायरनं आपले अर्धशतक साजरे केले. दुसरी धाव घेताना नॉन स्ट्राइक एन्डला तो बुमराहला धडकला. आधीच बुमराहनं या षटकात १८ धावा खर्च केल्या होत्या. त्याचा राग त्याने करुण नायरवर काढल्याचे दिसून आले.
नेमकं काय घडलं?
यावेळी बुमराह करुण तू जिथून पळत आहेस ती माझी जागा आहे, असे म्हटले. यावर करुण नायर त्याला काही तरी रिप्लाय देतानाही दिसून आले. हार्दिक पांड्याने दोघांच्यातील वाद मिटवला. ड्रिंक्स ब्रेकमध्येही बुमराह करूण नायरच्या दिशेन आला आणि त्याला काही तरी म्हणाला. हा सर्व प्रकार घडत असताना ड्रिंक्स ब्रेकमध्ये रोहित शर्मा दोघांच्यातील भांडणाची मजा घेताना दिसले. नायरनं थेट बुमराहशी पंगा घेतल्यानं तोही थोडा सरप्राइज झाल्याचेही व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले.