Join us

IPL 2025 : प्रत्येक सामन्यात लक्षवेधी कामगिरी करतोय दिल्ली कॅपिटल्सच्या संघातील हा नवा चेहरा

पदार्पणाच्या IPL हंगामात अष्टपैलू विपराजनं आपली खास छाप सोडल्याचे दिसते. तो फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवतोय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 17:21 IST

Open in App

IPL 2025 DC vs MI 29th Match Player to Watch Vipraj Nigam Delhi Capitals : आयपीएल २०२५ च्या हंगामात अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने एकदम धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कॅप्टन्सी करताना अक्षर पटेलनं संघाला पहिल्या ४ सामन्यात विजय मिळवून दिला आहे. या संघाकडून स्टार खेळाडू लोकेश राहुल यानेही जबरदस्त सुरुवात केली आहे. संघाच्या यशात संघातील दोन अनकॅप्ड खेळाडूंनीही मोलाचा वाटा उचललाय. त्यातील एक चेहरा म्हणजे विपराज निगम. पदार्पणाच्या IPL हंगामात अष्टपैलू विपराजनं आपली खास छाप सोडल्याचे दिसते. तो फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवतोय.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची स्वस्तात मस्त शॉपिंग

विपराज निगम याचा जन्म २८ जुलै २००४ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाआधी दुबईतील जेद्दाह येथे पार पडलेल्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने ५० लाख बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. २० वर्षीय विपराज हा उजव्या हाताने फलंदाजी करण्यासोबत एक लेग स्पिनरही आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशच्या संघाकडून खेळतो. 

IPL 2025 : MI च्या ताफ्यातील भरवशाचा मोहरा; मध्यफळीसह सातव्या क्रमांकावरही दाखवलाय तोरा

एक नजर विरापराजच्या देशांतर्गत कामगिरीवर

विपराज निगम याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त ३ सामने खेळले आहेत. यात सहा डावात त्याच्या खात्यात १३ विकेट्स आणि ४३ झाला जमा आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ४ विकेट्स आणि ९ धावा तर टी-२० मध्ये त्याने ८ विकेट्सशिवाय १०३ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

IPL मधील कामगिरी

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने १५ चेंडूत ३९ धावांच्या खेळीसह सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात त्याने एक विकेटही घेतली होती. चेन्नई सुपर किंग्ज विुरुद्धच्या सामन्यातही त्याला बॅटिंगची संधी मिळीली. पण या सामन्यात तो २ चेंडूत एका धावेवर बाद झाला. पण गोलंदाजीत त्याने २ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात त्याने विराट कोहली आणि क्रुणाल पांड्याची विकेट घेत मैफिल लुटली होती. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५दिल्ली कॅपिटल्सइंडियन प्रीमिअर लीग