Join us

नव्या संघाकडून Mitchell Marsh नं जुन्या फ्रँचायझी संघाला धुतलं; IPL मध्ये जलद अर्धशतकही ठोकलं

दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकल्यावर तो आयपीएलच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 22:26 IST

Open in App

IPL 2025 DC vs LSG Mitchell Marsh  लखनौच्या ताफ्यात सामील झालेल्या ऑस्ट्रेलियन मिचेल मार्शनं यंदाच्या हंगामात धमाकेदार सुरुवात केली आहे. ज्या दिल्ली कॅपिटल्स  संघानं खराब कामगिरीमुळे त्याला संघाबाहेरचा काढले त्यांच्याविरुद्ध नव्या संघाकडून मिचेल मार्शनं आपले तेवर दाखवले. दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकल्यावर तो आयपीएलच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ज्यांनी संघाबाहेर काढल त्यांच्यावर फटकेबाजीसह काढला राग

मिचेल मार्श हा ऑलराउंडर असला तरी यंदाच्या हंगामात तो फक्त बॅटरच्या रुपातच संघातून खेळेल, असे आधीच  स्पष्ट करण्यात आले होते. फक्त बॅटिंग करणार असलो तरी पैसा वसूल शो दाखवणार हेच त्याने पहिल्या  लढतीत दाखवून दिले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात त्याने २१ धावा अर्धशतक पूर्ण केले.आयपीएलच्या इतिहासातील त्याच्या भात्यातून आलेले हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. एवढेच नाही तर यंदाच्या हंगामातील हे संयुक्तरित्या जलद अर्धशतक आहे.

DC च्या ताफ्यातून बाहेर पडत घरी परतला KL राहुल; LSG विरुद्ध न खेळण्यामागचं कारण काय?

५ वर्षांनी त्याच्या भात्यातून आली स्फोटक खेळी

टी-२० कारकिर्दीत त्याने पाच वर्षांनी तुफानी अर्धशतक झळकावले आहे. याआधी मिचेल मार्शनं पाच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेत २१ चेंडूत अर्धशतक झळकावले होता. आता त्याने आयपीएलमध्ये धमाकेदार खेळी करत लखनौ संघाच्या बॅटिंगची ताकद वाढवली आहे. संघाच्या डावाला जबरदस्त सुरुवात करून देताना त्याने ३६ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने  ७२ धावा कुटल्या.  

 गत हंगामात दिल्लीकडून फ्लॉप ठरला, आता त्यांच्याविरुद्ध दाखवला हिट शो

लखनौच्या संघानं ३.४० कोटी मोजत मिचेल मार्शला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. फलंदाजीसह तो गोलंदाजीतही उपयुक्त ठरेल, असा खेळाडू आहे. पण दुखापतीमुळे तो यंदाच्या हंगामात गोलंदाजी करू शकणार नाही. त्यामुळे लखनौच्या ताफ्यातील हा गडी फुल पगार घेऊन हाफ ड्युटी करणार असेच चित्र निर्माण झाले होते. पण पहिल्याच सामन्यात धमाकेदार खेळीनं फक्त बॅटिंग करणार असलो तरी त्यात कमी पडणार नाही, याचे संकेत दिले आहेत. गत हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना ४ सामन्यात त्याने ६४ धावा काढल्या होत्या. यात २३ ही त्याची सर्वोच्च खेळी होती. पण आता याच संघाविरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात ७२ धावांची दमदार खेळी केली आहे.