Join us

IPL 2025 DC vs LSG : नेमकी नवी 'लव्ह स्टोरी' फुलताना पंतला 'दिल्लीवाली जुनी गर्लफ्रेंड' भेटणार!

पंत नवी 'लव्ह स्टोरी' सुरु करत असताना आला जुन्या गर्लफ्रेंडच्या भेटीचा योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 04:28 IST

Open in App

सध्याच्या घडीला क्रिकेट प्रेमींसाठी आनंदी आनंद गडे असे वातावरण आहे. कारण  प्रत्येक दिवशी टी-२० सामन्याचा नवा थरार त्यांना अनुभवायला मिळतोय. सोमवारी आयपीएलच्या १८ व्या हंगामातील तिसऱ्या दिवशी दिल्ली कॅपिटल्ससाठी पहिल्या लढतीत विशाखापट्टणमचं मैदान हे घरचे मैदान असेल. इथंच ते लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध खेळताना दिसतील. हा चौथा सामना आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या रिषभ पंतसाठी कमालीचा योगोयोग घेऊन आलाय. कारण आयपीएलच्या नव्या हंगामात गलेलठ्ठ पगार मिळाल्यावर नवाबी थाट असणाऱ्या लखनौ टीमसोबतची 'लव्ह स्टोरी' सुरु करताना त्याला 'दिल्लीवाली जुनी 'गर्लफ्रेंड' भेटणार आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

थोडक्यात जाणून घ्या पंतचं पहिलं प्रेम अन् ब्रेकअपसंदर्भातील स्टोरी 

रिषभ पंतनं आयपीएलच्या आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही २०१६ मध्ये दिल्ली फ्रँचायझीच्या दिल्ली डेयरडेविल्स संघाकडून (सध्याचा संघ दिल्ली कॅपिटल्स) केली. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तो दिल्लीकडूनच खेळतो. त्यामुळे दिल्ली फ्रँचायझी टीम हे त्याचं पहिलं प्रेमच. गेल्या काही हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करतानाही  दिसला. पण आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी  दिल्ली कॅपिटल्स अन् पंत यांच्यात ब्रेकअप झालं. आता ते का झालं कसं झालं? तो विषय संपलाय. "तेरे लिए ही तो सिग्नल तोड़ ताड़ के आया दिल्लीवाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के" असं गाणं म्हणतच पंत दिल्ली कॅपिटल्स टीम सोडून नवाबी थाट असणाऱ्या लखनौच्या टीमचा भाग झालाय.

पंतची नवी 'लव्ह स्टोरी' सुरु होण्याआधीपासूनच गाजतीये; कारण...

रिषभ पंत लखनौ सुपर जाएंट्स टीमसोबत आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात करतोय. या टीमसह मैदानात उतरून जलवे दाखवण्याआधीपासून त्याची लव्ह स्टोरी गाजतीये. त्यामागचं कारण मेगा लिलावात त्याच्यावर या LSG टीमनं विक्रमी २७ कोटी एवढी मोठी बोली लावली अन् पुढे त्यालाच कॅप्टन म्हणूनही निवडलं आहे.

कधी ना कधी भेट होणारच होती, पण जुळून आला पहिली भेट चर्चेत येण्याचा योग

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत आरसीबीसोबत एकनिष्ट असणारा  विराट कोहली सोडला तर प्रत्येकाने टीम बदलल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक खेळाडू आपल्या पूर्वीच्या टीमविरुद्ध भिडल्याचेहीही दिसून आले आहे. पंतच्या बाबतीतही अशी भेट होणार ते निश्चित होते. पण पंत नवी 'लव्ह स्टोरी' सुरु करत असतानाच  जुन्या गर्लफ्रेंडच्या भेटीचा योग जुळून आल्याचे दिसते. त्यामुळेच ही गोष्ट चर्चेत येण्याजोगी आहे. 

 शतकी 'रोमान्स'चा डाव साधण्याची संधी

२०१६ मध्ये  १.९० कोटी रुपयांसह दिल्ली फ्रँचायझीला जॉईन झालेल्या पंतचा २०२४ पर्यंत  कमाईचा आकडा १६ कोटींपर्यंत पोहचला होता. या कालावधीत त्याने या संघाकडून १११ सामने खेळताना एक शतक आणि १८ अर्धशतकाच्या मदतीने ३ हजार २८४ धावा केल्या आहेत. याशिवाय विकेटमागे त्याने ७५ कॅचेस आणि २३ स्टंपिगच्या रुपात ९८ गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. आता लखनौच्या ताफ्यातून तो २७ कोटी या विक्रमी किंमतीसह नवी इनिंग सुरु करतोय. या नव्या लव्ह स्टोरीत जुन्या टीमसोबत विकेट मागे त्याला शतकी रोमान्सची म्हणजेच १०० विकेटमागे शंभर बळी पूर्ण करण्याचा पल्ला गाठण्याची संधी आहे.      

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५लखनौ सुपर जायंट्सदिल्ली कॅपिटल्सरिषभ पंतइंडियन प्रीमिअर लीग